पुणे : शिवाजीनगर येथील जिल्हा सत्र न्यायालयाच्या प्रमुख जिल्हा न्यायाधीशपदी एस. सी. चांडक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आणि चांडक यांनी नुकताच पदभार स्वीकारला.
जिल्हा न्यायालयाचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या जागी कोल्हापूर येथील जिल्हा न्यायालयात प्रमुख जिल्हा न्यायाधीश म्हणून कार्यरत असलेले न्यायाधीश चांडक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
न्यायाधीश एस. सी. चांडक यांनी १९९४ मध्ये विधी अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी वकील व्यवसाय सुरू केला. चांडक यांनी फेब्रुवारी २००२ ते मे २००८ पर्यंत ते अंजनगाव येथील प्रथमवर्ग न्यायालयात सहायक सरकारी वकील म्हणून कामकाज पाहिले. त्यांनतर त्यांची मुंबई शहर दिवाणी आणि सत्र न्यायालय जिल्हा न्यायाधीश म्हणून मे २००८ मध्ये नियुक्ती करण्यात आली.चांडक यांनीतेथे विविध न्यायालयात न्यायदानाची जबाबदारी पार पाडली.
दरम्यान, सध्या चांडक हे कोल्हापूर येथील जिल्हा न्यायालयात प्रमुख जिल्हा न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. त्यांची जिल्हा सत्र न्यायालयाच्या प्रमुख जिल्हा न्यायाधीशपदी एस. सी. चांडक यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी नुकताच पदभार स्वीकारलेला आहे.