Pune Crime News : पुणे : विश्रांतवाडी परिसरातील एका गृहनिर्माण सोसायटीत सुरक्षा रक्षकाच्या मारहाणीत श्वानाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी प्राण्यांशी क्रूरतेने वागल्याप्रकरणी सुरक्षा रक्षकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. Pune Crime News

याबाबत मोनिका बुद्धीमान छेत्री (रा. लोहगाव) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रांतवाडीतील गुडविल ऑर्चिड सोसायटीच्या आवारात १५ मे रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास एक श्वान शिरला होता. यावेळी त्या श्वानाने तेथील सफाई कर्मचाऱ्याला चावा घेण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. Pune Crime News

यानंतर संतापलेल्या सुरक्षा रक्षकाने श्वानाला काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत श्वान गंभीर जखमी झाला आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे मृतावस्थेतील श्वानाला इतरांच्या मदतीने रस्त्यावर फेकून दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. Pune Crime News
घटनेची माहिती श्वानप्रेमी मोनिका छेत्री यांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित सुरक्षा रक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. Pune Crime News







