Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhigvan News : भिगवण उपबाजारात ‘भुगा माशांचा’ अवैध धंदा तेजीत; कायद्याची ऐशीतैशी करत छोट्या माशांची सर्रास विक्री, आठ दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा..

सागर जगदाळेby सागर जगदाळे
Monday, 18 May 2026, 13:50

Bhigvan News : भिगवण, (पुणे) : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येत असलेल्या भिगवण उपबाजार परिसरात सध्या प्रतिबंधित असलेल्या ‘भुगा माशांची’ बेकायदेशीर विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या बेकायदेशीर व्यवसायामुळे संपूर्ण परिसरात कमालीची अस्वच्छता आणि असह्य दुर्गंधी पसरली असून, स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. काही ठराविक व्यापाऱ्यांच्या आर्थिक फायद्यासाठी प्रशासनाने लाखो नागरिकांचे आरोग्य पणाला लावल्याचा घणाघाती आरोप आता ग्रामस्थांमधून होत आहे. Bhigvan News :

ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार, मत्स्यसंपत्तीच्या संवर्धनासाठी आणि जलचरांच्या संरक्षणासाठी शासनाने लहान आकाराच्या माशांची (भुगा मासे) मासेमारी करणे, त्यांची पकड करणे आणि विक्री करणे यावर कायदेशीर निर्बंध घातले आहेत. असे असतानाही, भिगवण उपबाजारात या नियमांची सर्रास अंमलबजावणी न करता दररोज रात्री आणि पहाटे मोठमोठ्या कंटेनरमधून खराब व दुर्गंधीयुक्त भुगा मासे आणले जात आहेत. या अवैध व्यापारात दरमहा लाखो रुपयांची काळी उलाढाल होत असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. Bhigvan News :

मार्केट परिसरात कचऱ्याची आणि टाकाऊ अवशेषांची कोणतीही विल्हेवाट लावली जात नाही. मासळीचे सडलेले अवशेष आणि साचलेल्या घाण पाण्यामुळे तब्बल एक किलोमीटर परिसराचा श्वास कोंडला आहे. याचा सर्वाधिक फटका लहान मुले, वृद्ध आणि स्थानिक व्यापाऱ्यांना बसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे मासे वाहून आणणारे कंटेनर चालक कंटेनरमधील रक्तमिश्रित घाण पाणी जाणीवपूर्वक भिगवण-राशीन महामार्गावर सोडून देतात, ज्यामुळे रस्त्यावरील पादचाऱ्यांना आणि इतर वाहनधारकांना उलट्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. Bhigvan News :

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या समस्येबाबत दरवर्षी कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर प्रशासनाला निवेदने दिली जातात. मात्र, दरवेळी केवळ तात्पुरती मलमपट्टी करून नागरिकांची बोळवण केली जाते. उपबाजारातील संबंधित कर्मचारी आणि अधिकारी या गंभीर प्रकाराकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असून, भ्रष्ट व्यापाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा संताप व्यक्त होत आहे. Bhigvan News :

 

दरम्यान, या समस्येची गंभीर दखल घेत ग्रामस्थांनी कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर, तहसीलदार कार्यालय, तालुका वैद्यकीय अधिकारी (पंचायत समिती इंदापूर) आणि भिगवण ग्रामपंचायत यांना लेखी निवेदने दिली आहेत. Bhigvan News :

प्रेम जगताप, सागर देहाडे, रोहन देहाडे व विशाल कांबळे यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर उपबाजार भिगवण प्रशासनाने या दुर्गंधीयुक्त समस्येवर लवकरात लवकर कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे. आता या आरोग्यास घातक ठरणाऱ्या अवैध व्यवसायावर इंदापूरचे तहसीलदार आणि बाजार समिती प्रशासन काय दणका देणार, याकडे संपूर्ण भिगवण परिसराचे लक्ष लागले आहे. Bhigvan News :

 

सागर जगदाळे

सागर जगदाळे

अडीज वर्ष दैनिक पुण्यनगरी काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये भिगवण येथील प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील बातम्या लिहिण्याचा खूप मोठा अनुभव आहे.

ताज्या बातम्या

रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान; ‘राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव’ म्हणताच वाद पेटला..

Tuesday, 29 September 2026, 23:05

मुंबईच्या पॉश एरियात भरधाव कारचा कहर! तिघांना उडवलं; पत्नीच्या डोळ्यांसमोर पतीचा दुर्दैवी अंत

Tuesday, 29 September 2026, 22:22

पूजा खेडकर प्रकरणात मोठी कारवाई! वडील दिलीप खेडकर यांच्या घरावर ACBचा छापा,नेमकं काय सापडलं?

Tuesday, 29 September 2026, 22:04

भरदिवसा भाजप नेत्याच्या पुतण्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला! 16-17 जणांनी घेरून बेदम मारहाण

Tuesday, 29 September 2026, 21:22

कारेगावात पाण्याच्या प्लांटमध्ये झालेल्या गोळीबारात तरुणाचा खून

Tuesday, 29 September 2026, 19:50

कोट्यवधींच्या घोटाळ्याची फाईल पुन्हा उघडणार? नीरव मोदीचा साथीदार UAEतून भारतात,,CBIच्या ताब्यात

Tuesday, 29 September 2026, 19:32
Next Post
Loni kalbhor

Loni Kalbhor News : “तुझा मर्डर करून टाकतो...” म्हणत तरुणाच्या डोक्यात बिअरच्या बाटल्या फोडल्या; चौघांविरोधात गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp