Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : “तुझा मर्डर करून टाकतो…” म्हणत तरुणाच्या डोक्यात बिअरच्या बाटल्या फोडल्या; चौघांविरोधात गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 18 May 2026, 13:56
Loni kalbhor

photo- social media

Loni Kalbhor News लोणी काळभोर, ता. 18 : “तू आमच्याकडे का पाहतो? आम्ही येथील भाई आहोत… तुझा मर्डर करून टाकतो,” अशी धमकी देत चौघांनी एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून त्याच्या डोक्यात बिअरच्या बाटल्या फोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील सागर रेस्टॉरंट अँड बारमध्ये शनिवारी (ता. 16) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, लोणी काळभोर पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. Loni Kalbhor News

राज राजेंद्र पवार, सौरभ सुनील गायकवाड, राहुल संतोष गाडगे आणि 17 वर्षीय विधीसंघर्ष बालक (सर्व रा. कवडीपाट टोलनाका, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी प्रसाद दिलीप शेंडगे (वय 30, रा. कवडीपाट टोलनाका, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. Loni Kalbhor News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद शेंडगे हे कवडीपाट परिसरातील सागर बार अँड रेस्टॉरंटमध्ये जेवण करत होते. त्यावेळी त्यांच्या मागील टेबलावर आरोपी बसले होते. अचानक आरोपींनी “आमच्याकडे का पाहतो? आम्ही येथील भाई आहोत,” असे म्हणत शेंडगे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर चौघांनी मिळून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. Loni Kalbhor News

यानंतर आरोपींनी शेजारील टेबलवरील बिअरच्या बाटल्या उचलून शेंडगे यांच्या डोक्यावर, छातीवर, नाकावर, कानावर आणि गळ्यावर वार करत त्यांना गंभीर जखमी केले. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी दगड फेकून मारत “तुझा मर्डर करून टाकतो,” अशी धमकीही दिली. तसेच बाहेर उभ्या असलेल्या तुकाराम राजेंद्र कांबळे (रा. लडकत रोड, शिवनगर, मुंढवा, पुणे) यांनाही मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

 

जखमी प्रसाद शेंडगे यांच्यावर लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांच्या फिर्यादीवरून लोणी काळभोर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 109, 118(1), 115(2), 125, 352, 351(2)(3), 3(5) तसेच क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कलम 7 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. Loni Kalbhor News

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाले असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुपाली जाधव करत आहेत. Loni Kalbhor News

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान; ‘राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव’ म्हणताच वाद पेटला..

Tuesday, 29 September 2026, 23:05

मुंबईच्या पॉश एरियात भरधाव कारचा कहर! तिघांना उडवलं; पत्नीच्या डोळ्यांसमोर पतीचा दुर्दैवी अंत

Tuesday, 29 September 2026, 22:22

पूजा खेडकर प्रकरणात मोठी कारवाई! वडील दिलीप खेडकर यांच्या घरावर ACBचा छापा,नेमकं काय सापडलं?

Tuesday, 29 September 2026, 22:04

भरदिवसा भाजप नेत्याच्या पुतण्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला! 16-17 जणांनी घेरून बेदम मारहाण

Tuesday, 29 September 2026, 21:22

कारेगावात पाण्याच्या प्लांटमध्ये झालेल्या गोळीबारात तरुणाचा खून

Tuesday, 29 September 2026, 19:50

कोट्यवधींच्या घोटाळ्याची फाईल पुन्हा उघडणार? नीरव मोदीचा साथीदार UAEतून भारतात,,CBIच्या ताब्यात

Tuesday, 29 September 2026, 19:32
Next Post

Como Acionar Bônus no Betmatch Casino no Brasil

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp