Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकाच्या डोक्यात फोडली बिअरची बाटली ; उरुळी कांचन येथील घटना

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 4 December 2025, 18:05

Pune Crime, उरुळी कांचन  : दारू पिण्यास पैसे न दिल्याने शिवीगाळ, दमदाटी करून एकाच्या डोक्यात  बिअरची बाटली फोडल्याची घटना घडली आहे. ही घटना उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील तळवाडी चौकात मंगळवारी (ता. 02) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास  घटना घडली आहे. या मारहाणीत एकजण गंभीर जखमी झाला आहे तर  उरुळी कांचन पोलीस ठाण्यात एकावर विविध गंभीर काळामन्वये  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (pune crime)

 

परेश विठ्ठल कांचन (वय-28, रा. आश्रम रोड, गणेश मंदिरासमोर, उरुळी कांचन, ता. हवेली) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे.तर संतोष उर्फ बुनक्या शिंदे ( वय व पुर्ण  नाव माहीती नाही, रा. श्रीराम पतसंस्थेजवळ, तळवाडी चौक, उरुळी कांचन, ता. हवेली) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी परेश कांचन हे  पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्यावरून मंगळवारी (ता. 02) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास चालले होते. परेश कांचन यांना तळवाडी चौकाजवळ असलेल्या हॉटेल शैलेजा येथे  संतोष शिंदे उर्फ बुनक्या हा भेटला. बुनक्या याने कांचन यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्यावेळी कांचन याने माझ्याकडे  पैसे नाहीत.  मी तुला दारू पिण्यासाठी पैसे देणार नाही असे स्पष्ट सांगितले.

दरम्यान, दारू पिण्यास पैसे न दिल्याने बुनक्या व  कांचन यांच्यामध्ये बाचाबाची झाली.  याचा राग  मनात धरून संतोष शिंदे याने कांचन यांना शिवीगाळ दमदाटी केली. व रागाच्या भरात बुनक्या याने हातातील बिअरची बाटली कांचन यांच्या डोक्यात मारली. त्यानंतर कांचन यांना खाली पाडुन हाताने  व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.  तसेच बुनक्याने कांचन यांच्या  डोक्यात व छातीवर चावा घेतला.

या मारहाणीत कांचन हे जखमी झाले होते. त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव येत होता. कांचन यांनी उपचार घेतल्यानंतर आरोपी संतोष शिंदे उर्फ बुनक्या याच्यावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष शिंदे उर्फ बुनक्या याच्यावर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 118 (1), 115 (2), 351(2), 352  प्रमाणे  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड करत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post
Vasantdada Sugar Institute: Investigation into Sharad Pawar's 'Vasantdada Sugar Institute' begins; Financial transactions of 17 years sought; What is the matter?

Vasantdada Sugar Institute: शरद पवारांच्या 'वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट'ची चौकशी सुरू; 17 वर्षांतील आर्थिक व्यवहारांचा ताळेबंद मागवला; प्रकरण काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.