पुणे : पुणेकरांच्या खर्चामध्ये आणखी वाढ होणार आहे. कारण सीएनजीच्या दरांमध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (MNGL) कडून सीएनजीच्या दरांमध्ये 1.10 रुपये प्रति किलो इतकी दरवाढ करण्यात आली आहे. 2024 मधील ही चौथी दरवाढ आहे.
सीएनजीसाठी आता नवीन किंमत 89 रुपये प्रतिकिलो इतकी राहणार आहे. याआधी सीएनजीचा दर 87.90 प्रतिकिलो इतका दर होता. आता पुणे, पिंपरी- चिंचवड शहरासह जिल्ह्यात सीएनजीचे नवीन दर 89 रुपये प्रतिकिलोवर पोहचले आहेत. या दरवाढीनंतर सीएनजी पेट्रोलपेक्षा 40 टक्के आणि डिझेलपेक्षा 20 टक्क्यांहून अधिक स्वस्त आहे.
शहरात साधारण सर्व रिक्षा सीएनजीवर चालतात. यामुळे ही दरवाढ खिशाला चटका देणारी आहे. जागतिक ऊर्जा बाजारातील सुरु असलेल्या चढ उतारांमुळे सीएनजीच्या दरात वाढ केल्याचं सांगितलं जात आहे. या दरवाढीमुळे सीएनजी वर धावणा-या वाहनांच्या खर्चात वाढ झाली आहे.