लहू चव्हाण
पाचगणी : महात्मा ज्योतिराव फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात शिवाजी चौक पाचगणी येथे निषेध नोंदवण्यात आला.
लोकनेते भगवानराव वैराट यांच्या आदेशावरून व सातारा जिल्हाध्यक्ष शिवाजी भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी १३ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता शिवाजी चौक पाचगणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रयतेचे राजे छत्रपती शिवराय यांना पुष्पहार अर्पण करून राज्य कामगार सुरक्षा दल, प्रदेश दलित विकास आघाडी प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थित चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणा देऊन निषेध नोंदवण्यात आला.
यावेळी अभिजीत (सनी) ननावरे म्हणाले, महापुरुषांच्या त्यागाचा, कष्टाचा व शौर्याचा इतिहास ज्ञात आहे.आम्ही सन्माननीय लोकनेते भगवानरावजी वैराट यांचे शिष्य या नात्याने तसेच महापुरुषांच्या विचारसरणीचे वंशज असल्याकारणाने आम्ही कदापि चुकीचा इतिहास व महापुरुषांबद्दल अशोभनीय बेताल वक्तव्य समाजात पसरू देणार नाही.
यावेळी नितीन वन्ने राज्य कामगार सुरक्षा दल महाबळेश्वर तालुका अध्यक्ष अभिजीत (सनी) ननावरे, राज्य कामगार सुरक्षा दल मश्वर ता. सरचिटणीस, प्रदेश दलित विकास आघाडी मश्वर ता. अध्यक्ष विकास भाऊ भोसले राज्य कामगार सुरक्षा दल ता. कार्याध्यक्ष मश्वर ऋषिकेशजी वायदंडे, झोपडपट्टी सुरक्षा दल मश्वर तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे, दादू कांबळे, संदीप माने,सचिन कांबळे, शितल आठवाल, सुनीता कांबळे, रंजना तांबे, आशा शिवडवकर, सागर कदम, सागर कदम, अनिल धोत्रे, संदीप सपकाळ, महेंद्र कांबळे आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नितीन वन्ने, ऋषिकेशजी वायदंडे यांनी आभार मानले.