पुणे : मुंबई- बंगळुरू बाह्यवळण महामार्गावरील नवले पूल परिसरात पुन्हा एकदा वेश्याव्यवसाय सुरु असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी चार महिलांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन महिन्यांपूर्वी नवले पूल परिसरात पोलिसांनी कारवाई केली होती. त्यानंतर या भागात पु्न्हा वेश्याव्यवसाय सुरू असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात आली हाेती. वाहतुकीस अडथळा, तसेच अश्लील हावभाब केल्याप्रकरणी गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
सिंहगड रस्त्यावरील नवले पूल परिसरात गेल्या काही महिन्यांपासून काही महिला रस्त्यावर थांबून वेश्याव्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यासंदर्भात नागरिकांकडून तक्रारी करण्यात आल्या होत्या. या भागातील रहिवाशांनी कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार दोन महिन्यांपूर्वी पोलिसांनी देहविक्रय करणाऱ्या आठ महिलांविरुद्ध कारवाई करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
रस्त्यावर थांबून अश्लील हावभाव..
या महिला रस्त्यावर थांबून अश्लील हावभाव करतात. त्यामुळे या भागातील महिला आणि युवतींना त्रास होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या होत्या. नवले पुलाशेजारी असलेल्या सेवा रस्त्यावर या महिल्या थांबतात सिंहगड रस्ता पोलिसांनी दोन महिन्यापूर्वी येथे कारवाई केली. त्यानंतर या भागात वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांनी थांबणे बंद केले होते. त्यानंतर या भागात पुन्हा वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला थांबून अश्लील हावभाव करत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाये पुढील तपास करत आहेत.