पुणे : कोरेगाव पार्क भागातील एका सदनिकेत सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर छापा टाकून पोलिसांनी थायलंडमधील दोन तरुणींना ताब्यात घेतले. तरुणींना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी थायलंडमधील एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस हवालदार रईसा बेग यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्याविरुद्ध अनैतिक मानवी देहव्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी गु्न्हा दाखल करण्यात आलेली महिला मूळची थायलंड येथील आहे. तिने कोरेगाव पार्कमधील एका सोसायटीत सदनिका भाडेतत्त्वावर घेतली होती. थायलंडमधील दोन तरुणींना स्पामध्ये काम देण्याच्या आमिषाने तिने भारतात आणले होते. कोरेगाव पार्कमधील सदनिकेत थायलंडमधील दोन तरुणी वेश्याव्यवसाय करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सातपुते, गु्न्हे शाखेचे निरीक्षक मोरे यांच्या मार्गदर्शनखाली पथकाने सदनिकेत छापा टाकून दोन तरुणींना ताब्यात घेतले. तरुणींना वेश्याव्यवसायास प्रवृत्त करणाऱ्या महिलेविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.