पुणे : उकाड्याने कासावीस झालेल्या पुणेकरांना अवकाळी पावसाने दिलासा दिला आहे. त्यामुळे तापलेल्या वातावरणातील दाह कमी होऊन वातावरणात गारवा निर्माण झाला. याबरोबरच अनेक जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि वा-यासह पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्यान वर्तवली आहे.
सध्या पुणे, कोल्हापूर, सांगली आणि अहमदनगर जिल्ह्यांतील काही भागात पाऊस पडला आहे. त्याचबरोबर येत्या तीन तासांच इतरही काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/S5G2KHFEzX— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 10, 2024
काही ठिकाणी ढग दाटून आले असून पावसाचं वातावरण तयार झालं आहे. तर काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरीही लावली आहे. या सुरु असलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. अवकाळी पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, पाऊस आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) पडण्याची शक्यता आहे, यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, छ.संभाजीनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे.