Pune, Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पुण्यात महात्मा फुले यांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, महात्मा फुले यांनी जो लढा सुरू केला, त्याची फळे आपण चाकतो आहोत, तसेच सामाजिक, धार्मिक स्वतंत्र मिळालं. आज देशात हिंदू असूनही देशात, पुन्हा वैदिक परंपरा सुरू कराव्या आशा मागणी होत आहेत. असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
ते पुढे बोलताना म्हणाले, आरएसएस किंवा विश्व हिंदू परिषद यांनी जरी म्हटले नसले तरी पण देवेंद्र फडणवीस यांना संघाच्या कार्यकारणीत प्रांत प्रतिनिधी पदापर्यंत जाता आलं नाही. ते आज सांगतात मी असताना संविधान बदलणार नाही. माझ्या मते रस्त्यावरील माणूस कितीही ओरडला तर त्याच्यावर कुणीही विश्वास ठेवत नाही. देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे. आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत हे जोपर्यंत असे वक्तव्य करत नाही तोवर आम्ही मान्य करणार नाही. , अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.
अनेक ठिकाणी दंगलग्रस्त परिस्थिती आहे, प्रत्येक पोलीस स्टेशनला सतर्क करण्यात आले आहे, कुठल्याही परिस्थितीत ६ डिसेंबरनंतर काहीही घडू शकतं पण हे चार राज्याच्या निवडणूका झाल्यानंतर घडेल असे ही प्रकाश आंबेडकर म्हणाले. युध्दाबाबत पंतप्रधान वेगळी भूमिका घेतात तर दुसरीकडे परराष्ट्रमंत्री वेगळी भूमिका घेतांना दिसतात. असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.