पुणे : जिल्ह्यातील चर्चेत असणारा वडगाव शेरी मतदारसंघात मोठा उलटफेर बघायला मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) उमेदवार बापू पठारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) सुनील टिंगरे यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीत सुनील टिंगरे यांचा पराभव झाला आहे. बापू पठारे यांचा पाच हजार मतांनी विजय झाला आहे. कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरण सुनील टिंगरेंना भोवले असल्याचे बोललं जात आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी आमदार टिंगरे हे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून निवडणूकीच्या मैदानात होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी झालेले पोर्शे कार अपघात प्रकरण त्यांच्या अडचणी वाढवणारं ठरलं आहे. निवडणूक प्रचारात या प्रकरणाचा मुख्यतः वापर करून विरोधक त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसतानाही विनाकारण याचे राजकारण केले जात असल्याने टिंगरे यांनी माझी बदनामी केली तर न्यायालयात खेचीन असा इशाराच दिला होता. या सर्वांचा परिणाम मतांवर झाल्याची चर्चा होत आहे.
कल्याणीनगर प्रकरणा विरोधकांनी उचलून धरले..
निवडणुकीच्या प्रचारावेळी कल्याणीनगर भागातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोप, शरद पवारांना पाठवलेली नोटीस हे प्रमुख मुद्दे प्रचारावेळी पुढे करत टिंगरे यांच्यावर विरोधकांकडून हल्लाबोल करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या मतदारसंघातील भाजपचे इच्छुक उमेदवार जगदीश मुळीक यांनी देखील टिंगरेंनी कल्याणीनगर अपघात प्रकरणावरून टिंगरे यांच्यावर टीका केली होती. पोर्शे प्रकरणाने बापू पठारेंना तारले असे म्हणता येईल. कारण बापू पठारेंचा विजय हा अवघ्या पाच हजार मतांनी झाला आहे. म
2019 ची निवडणूक
2019 ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) सुनील टिंगरे यांनी जिंकली होती. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार जगदीश मुळीक यांचा 4956 मतांच्या फरकाने पराभव केला होता.