(Politics News) नवी दिल्ली : मंत्रिमंडळ विस्ताराआधीच महाराष्ट्रातल्या भाजप नेत्याची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या पदाला केंद्रीय गृहमंत्रालयाने कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा बहाल केला आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रपतींनी 2 डिसेंबर 2022 ला हंसराज अहीर यांची नियुक्ती केली होती. केंद्रीय गृहमंत्रालयाने एक पत्रक काढून या पदास केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा दिला आहे. भाजपचे राष्ट्रीय राजकारणातील विदर्भातील सक्रिय नेते अशी हंसराज अहिर यांची ओळख आहे.
हंसराज अहीर यांची राजकीय कारकीर्द…!
हंसराज अहीर यांनी यापूर्वी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचं 4 वेळा प्रतिनिधित्व केला आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य, खासदारकीच्या कार्यकाळात कोल व स्टीलसह अन्य संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्ष व सदस्य पदावरही त्यांनी काम केलं. 16 व्या लोकसभेत केंद्रीय गृहराज्यमंत्री तसेच रसायन मंत्री या पदांवरही ते होते.
2019 सालच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांनी हंसराज अहीर यांचा पराभव केला होता. बाळू धानोरकर हे महाराष्ट्रातून काँग्रेसचे एकमेव खासदार आहेत. अहिर यांनी भाजपमध्ये सर्वसाधारण कार्यकर्ते म्हणून राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली. यांच्यावर 1980 साली भारतीय जनता युवा मोर्च्याच्या चंद्रपूर शहर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर 1986 मध्ये ते भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य, 1990 साली भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि 1994 साली महाराष्ट्र विधान परिषदेचे सभासद झाले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Politics News : ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ झालं पाहिजे : अजित पवार
Politics News : राजकारणाचं युद्ध संपलय आता समाजकारणाचं युद्ध; रवींद्र धंगेकर