दिनेश सोनवणे
दौंड : राज्यातील पोलीस भरती प्रक्रियाला स्तगिती दिल्याने, राज्यातील युवकांची पुन्हा निराशा झाली असून युवकांचे पुढील भविष्य पुन्हा अंधारात तर नाही ना. असा प्रश्न पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांना पडला आहे.
राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी जारी केलेल्या,पोलीस भरती ला प्रशासकीय कारणास्तव स्तगिती दिली असून भरती ची प्रकिया पुढे ढकलण्यात आली आहे. या बाबत चे परिपत्रक ( ता २९ रोजी ) महाराष्ट्र राज्य प्रशिक्षण व खास पथकाचे पोलीस महासंचालक संजय कुमार यांनी परिपत्रकाद्वारे आदेश दिले आहे. राज्यात तब्बल १४ हजार ९५६ जागांसाठी पोलीस भरती प्रकिया राबविण्यात येणार होती.
या बाबत पोलीस भरती ची तयारी करणारे २८ वर्षीय युवक तुषार शिंदे म्हणाले, २०१४ पासून भरती तयारी करत आहे. आता पर्यंत केवळ रिक्त पदे असलेल्या जागा काढल्या जात आहे. या मध्ये संपूर्ण राज्यातून केवळ दोन ते तीन हजार जागा असायच्या,आमच्या वाट्याला केवळ ३ ते ५ जागा येत आहेत.
पोलीस भरती अनिश्चित असल्याने इच्छा नसताना देखील शेती करू लागलो, मात्र या ठिकाणी पण पावसामुळे नुकसान झाले आहे. युवकांचे वय बाद झाले असून भरती ची तयारी करणारे युवक सद्या खाजगी कंपनीत कंत्राटी कामगार काम करतात. हे वास्तव आहे. अशी खंत या युवकानी बोलून दाखवली आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड,इंदापूर, हवेली,पुरंदर या ठिकाणी पो. भरती तयारी करणाऱ्या अकॅडमी संख्या लक्षणीय आहे. अकॅडमी मध्ये पैसे भरून भरती ची तयारी करणारे युवक/ युवती अजून किती दिवस या ठिकाणी राहणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर दौंड शहरातील युवक/युवती हे शहरातील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक पाच (SRPF) राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सात (SRPF) व रेल्वे कामगार मैदान या ठिकाणी मैदान ची तयारी करत असतात.
पुणे प्राईम न्युजने उपस्थित केलेले प्रश्न :
१) पोलीस भरतीची निश्चित तारीख कधी जाहीर केली जाणार,
२) कोरोना (लॉकडाऊन ) मुळे मुलांचे दोन वर्षे वाया गेले आहे. ज्या युवकांचे/युवतीचे वय बाद झाले आहे त्यांना वय वाढवून मिळणार का?
३) भरती प्रक्रिया जी राबविण्यात येणार होती, त्याचा अभ्यासक्रम जुनाच असणार की नवीन.
४) लेखी परीक्षा ही ऑनलाईन, असणार की ऑफलाईन.