राजेंद्रकुमार शेळके
Pune News पुणे : साविञीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डाॅ. प्रा. तुकाराम रोंगटे यांच्या शुभहस्ते काव्यसंग्रह प्रकाशनाचा सोहळा नुकताच संपन्न झाला. नक्षञाचं देणं काव्यमंचचे संस्थापक राष्टीय अध्यक्ष प्रा.राजेंद्र दशरथ सोनवणे यांचे हे आठवे पुस्तक आहे. “ह्रदयाचे न बोलणारे ठोके”या दर्जेदार काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा साविञीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील मराठी विभागात हा आनंदी वातावरणात पार पडला. यावेळी विद्यापीठातील मराठी विभागातील विद्यार्थी वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता.
याप्रसंगी प्रा. तुकाराम रोंगटे म्हणाले,”कोणत्याही लेखकाला,कवीला व साहित्यिकाला आपले पहिले पुस्तक अर्थात आपले पहिले अपत्य जन्माला आल्यावर त्याची उत्सुकता असते. त्यानंतर त्या साहित्यिकाने पुढे आपले लेखन सातत्यपूर्वक करावे म्हणुन सर्वांनी प्रोत्साहान देण्याची गरज असते. त्यातुन अनेक प्रकारचे लेखन पुढे लिहिण्याची प्रेरणा मिळते. कवी वादळकार यांनी अनेक प्रकारचे साहित्य निर्माण केलेले आहे. साहित्य व काव्यक्षेञात त्यांची घौडदौड सुरुच ठेवली आहे. म्हणुनच आज त्यांच्या आठव्या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. कवी वादळकार यांच्या “ह्रदयाचे न बोलणारे ठोके” या काव्यसंग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनाला आमच्या सदैव शुभेच्छा आहेत. वाचकांनी या काव्यसंग्रहाचे जोरदार स्वागत करावे.
यावेळी कवी वादळकार यांच्या काही रचनांचे सादरीकरण झाले. त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला. यापुर्वी कवी वादळकार यांनी अनेक साहित्याची निर्मिती केलेली आहे. त्यात “वादळाची अशांतता”,”मनातील वादळ”,”वादळाचे घोंगावण”,”वादळ”,”वावटळ” या चारोळी काव्यसंग्रहाबरोबर त्यांचा “आसक्या”,हा ग्रामीण कथासंग्रह ही प्रकाशित आहे.