विशाल कदम
लोणी काळभोर : उरुळी कांचन ते सासवड, सासवड ते यवत यांसह ११ मार्गांवरील पीएमपीएमएल बस सेवा उद्या शनिवारपासून (ता.२६) कायम बंद होणार आहे. असा निर्णय पीएमपीएमएलकडून घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना प्रवासाची गैरसोय होणार असून अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.
ग्रामीण भागातील वाहतुकी वाहतुकीमध्ये कमी उत्पन्न होत आहे. असे पीएमपीएलचे म्हणने आहे. त्यामुळे या ११ मार्गावरील सेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे पीएमपीएमएल मार्फत सांगण्यात आले आहे. या मार्गांवर बस सेवा बंद केल्याने पिंपरी चिंचवडमध्ये जास्तीच्या बस सेवा पुरवल्या जाणार आहेत.
या खालील ११ मार्गावरील बस सेवा होणार बंद
१) उरुळी कांचन ते सासवड २) यवत ते सासवड ३) हडपसर ते मोरगाव ४) मार्केटयार्ड ते खारावडे ५) कापूरहोळ ते सासवड ६) स्वारगेट ते काशिंगगाव ७) चाकण ते शिक्रापूर फाटा ८) कात्रज ते विंझर ९) हडपसर ते जेजुरी १०) वाघोली ते राहूगाव, पारगाव ११) स्वारगेट ते बेलावडे
दरम्यान, या निर्णयाचा काही ग्रमीण नागरिकांना त्रास होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात रोजचा प्रवास करणाऱ्या तुरळक व्यक्ती आहेत. त्यामुळे बस सेवाचा पर्याय बंद केल्याने या नागरिकांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे.