पुणे : आज पुण्यातील रेस कोर्स येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य (Pm Narendra Modi ) सभा होणार आहे. पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघातील प्रचारासाठी पंतप्रधान मोदी पुण्यात येत आहेत. पुणे शहर भाजप आणि जिल्हा भाजपच्या वतीने पंतप्रधान मोदी यांचा भव्य सत्कार केला जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा पुण्यात येतात त्यावेळी त्यांच्यासाठी वेगळ्या पद्धतीची पगडी तयार केली जाते. त्या पगडीवर मराठी संस्कृतीचं रेखाटन केलेलं असतं. पुण्यातील प्रसिद्ध मुरुडकर झेंडेवाले (Murudkar Zendewale) यांच्यातर्फे ही पगडी तयार करुन घेतली जाते. यावेळीदेखील एक पगडी तयार करून घेण्यात आलेली आहे. दिग्विजय योद्धा पगडी (Digvijay Yodha Pagadi) असं या पगडीला नाव देण्यात आले आहे. आज मोदींच्या सभेपूर्वी भाजपच्या नेत्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून मोदींना प्रदान करण्यात येणार आहे.
दिग्विजय योद्धा पगडी ही संपूर्ण कॉटनची असून ही संपूर्ण हाताने बनवलेली आहे. पंचधातूचा वापर करून बनवलेली शुभचिन्हे या पगडीवर आहेत. ऐतिहासिक कोयऱ्या चांदीचे गोल्ड प्लेट्स, शिरोभागी आई तुळजाभवानीची प्रतिमा आहे. तसेच दिग्विज्याला साजेस सात घोड्यांचा राजेशाही स्टॅन्ड असणारी मराठा युद्धांच्या पराक्रमाची साक्ष देणारी मराठा दिग्विजय पगडी मोदी यांच्या सन्मान करण्यासाठी बनवण्यात आली आहे.
दिग्विजय योद्धा पगडी पूर्णपणे एअर कंडीशन आहे. रिसर्च टीमने पूर्ण अभ्यास करुन ही दिग्विजय योद्धा पगडी तयार केली आहे. पुण्यात सध्या प्रचंड प्रमाणात ऊन तापत आहे. या ऊन्हात उष्णता जाणवू नये, यासाठी या पगडीमध्ये एअर कंडीशनची सोय करण्यात आली आहे. एअर कंडिशन असल्याने ही पगडी वैशिष्ठपूर्ण आहे.