Pm Narendra Modi : देशात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरु आहे. सात टप्प्यात ही निवडणूक पार पडतेय. यामधील दोन टप्पे यशस्वीरित्या पार पडले आहेत. तर पाच टप्प्यांची निवडणूक अद्याप पार पडायची बाकी आहे. तत्पुर्वी कोविड लसीकरणाचे सर्टिफिकेटवरून (Corona Vaccine Certificate) पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (PM Narendra Modi) फोटो फोटो हटवण्यात आले आहे.
कोरोना काळात कोविड लस (Corona Vaccine) घेतल्यानंतर कोविन अॅपवरून नागरीकांना सर्टिफिकेट दिले जायचे. या सर्टिफिकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो झळकायचा. मात्र आता या सर्टिफिकेटवरुन मोदींचे फोटो गायब झाले आहेत. त्यामुळे नागरीकांमध्ये आश्चर्य व्यक्त होतं आहे. पण अचानक मोदींचे फोटो गायब होण्यामागचे कारण काय? तर देशात लोकसभा निवडणूक जाहिर झाल्या असल्या कारणाने आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या आचारसंहितेंमुळे कोवीड लसीकरणाच्या सर्टिफिकेटवरून मोदींचे फोटो हटवण्यात आले आहे.
Modi ji no more visible on Covid Vaccine certificates
Just downloaded to check – yes, his pic is gone ????#Covishield #vaccineSideEffects #Nomorepicture #CovidVaccines pic.twitter.com/nvvnI9ZqvC
— Sandeep Manudhane (@sandeep_PT) May 1, 2024
देशात मोठ्या प्रमाणात लोकांचे लसीकरण झालं आहे. या सगळ्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं जातं. भाजप नेत्यांनी याचा जोरदार प्रचार केला होता. मात्र, कोविशिल्ड लस बनवणारी कंपनी एस्ट्राजेनेकाने यूकेच्या कोर्टामध्ये दुष्परिणामांबाबत कबुली दिली आहे. त्यानंतर आरोग्य मंत्रालयाने हे मोठं पाऊल उचललं आहे.
आचारसंहितेमुळे आता सरकारच्या जितक्याही अधिकृत वेबसाईट आहेत, या वेबसाईटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो काढले गेले आहेत.पंतप्रधान कार्यालयाने देखील पंतप्रधान आणि इतर केंद्रीय मंत्र्यांचे फोटो काढले आहेत, परंतु काही मंत्रालयांनी अद्याप त्याचे पालन केलेले नाही.