नवी दिल्ली : राज्यभरामध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त (Maharashtra Day) उत्साहाचे वातावरण आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त विविध स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल रमेश बैस यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी झेंडावंदन करुन नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र दिन म्हणजे या भूमीचा वैभवशाली वारसा आणि अदम्य भावना यांचा गौरव करण्याचा दिवस आहे ज्या भूमीने महान दूरदर्शी घडवले आहेत आणि हा दिवस या राज्याच्या सांस्कृतिक समृद्धीशी संबंधित आहे. परंपरा, प्रगती आणि एकता यांच्या उत्तुंग दीपस्तंभाप्रमाणे महाराष्ट्र उभा आहे.…
— Narendra Modi (@narendramodi) May 1, 2024
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोंदींनी (PM Narendra Modi) मराठी भाषेतून ट्विट करतं म्हटलं की, महाराष्ट्र दिन म्हणजे या भूमीचा वैभवशाली वारसा आणि अदम्य भावना यांचा गौरव करण्याचा दिवस आहे ज्या भूमीने महान दूरदर्शी घडवले आहेत आणि हा दिवस या राज्याच्या सांस्कृतिक समृद्धीशी संबंधित आहे. परंपरा, प्रगती आणि एकता यांच्या उत्तुंग दीपस्तंभाप्रमाणे महाराष्ट्र उभा आहे.
महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करत राहण्याच्या आमच्या बांधिलकीचा आम्ही देखील पुनरुच्चार करत आहोत. महाराष्ट्राच्या जनतेला माझ्या हार्दिक शुभेच्छा.