पुणे : पुण्यातून थायलंडमधील फुकेत प्रांतासाठी विमानसेवा सुरू करण्याची मागणी जोर धरत असून यासाठी एका नामांकित विमान कंपनीनेदेखील ही सेवा सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे.
त्यामुळे आगामी काळात भारतीय विमानतळ प्राधिकरणाची परवानगी मिळाल्यास पुण्यातून थेट फुकेतसाठी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होऊ शकते.
पुण्यातून नुकतीच पुणे-बँकॉक ही सेवा सुरू झाली आहे. पुढील महिन्यात १२ डिसेंबरपासून पुणे-सिंगापूर ही विमानसेवा सुरू होणार आहे. त्यासोबतच सिंधिया यांनी ६ आंतरराष्ट्रीय विमानसेवेसोबतच अमेरिका, इंग्लंड आणि जर्मनीसाठीही पुण्यातून सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे सांगितले होते.
त्यामुळे आगामी काळात पुण्यातूनच थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, पुण्यातून आतापर्यंत दुबई येथील ‘शारजाह’साठी फक्त एकच आंतरराष्ट्रीय विमानाचे उड्डाण होत होते. मात्र, ऑगस्ट महिन्यात केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया पुणे दौर्यावर होते.
त्या वेळी त्यांनी पुण्यातून आणखी ६ ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली होती.