पिंपरी : “पत्रकार भवन”साठी पिंपरी चिंचवड श्रमिक पत्रकार संघ सर्वती मदत करणार आहे. असे प्रतिपादन अध्यक्ष- सुनील लांडगे यांनी केले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तिसऱ्या मजल्यावरील भा. वी. कांबळे पत्रकार कक्षात पिंपरी चिंचवड श्रमिक पत्रकार संघ व पिंपरी चिंचवड पत्रकार संघ यांची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी बोलताना वरील प्रतिपादन लांडगे यांनी केले आहे.
यावेळी पीसीबी वृत्तवाहीनीचे जेष्ठ पत्रकार – अविनाश चिलेकर, पिंपरी चिंचवड श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष, सुनील लांडगे-ब्युरोचिफ दै.महाराष्ट्र टाईम्स, विश्वास मोरे-दै.लोकमत, अनिल कातळेसर -एमपीसी न्युज, कैलास पुरी-झी 24 तास, डी.एस.कांबळे -सामटीव्ही, मिलिंद कांबळे- दै.पुढारी, अमोल काकडे -दै.पुण्यनगरी, गणेश यादव-दै.प्रभात, संदेश पुजारी-पीसी लाईव्ह7 आदी मान्यवर पत्रकार उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवडमध्ये भव्य दिव्य अशी पत्रकार भवनाची उभारणी लवकरच होणार असून तसा ठराव पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महासभेमध्ये झाला आहे. त्याविषयी व शहरातील पत्रकारांसाठी पत्रकार काॅलनी (घरे) याविषयी एकत्ररित्या महत्वाची चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते
दरम्यान, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले, कार्याध्यक्ष नाना कांबळे, बाळासाहेब ढसाळ यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. आयुक्त राजेश पाटील यांच्या सोबत नुकत्याच झालेल्या बैठकीत पत्रकार भवनाचा मार्ग मोकळा झाला आहे. असे सांगितले आहे.
या बैठकीत महिला अध्यक्षा – शबनम सय्यद, सोशलमिडीया अध्यक्ष – सुरज साळवे, उपाध्यक्ष – रोहीत खरगे, माधुरी कोराड, अनिल भालेराव, प्रशांत साळुंखे, दिलीप देहाडे, रामदास तांबे, विनायक गायकवाड, मारुती बानेवार, दत्तात्रय कांबळे, विश्वजीत पाटील, रेहान सय्यद, मदन जोशी आदी पत्रकार उपस्थित होते. या वेळी आभार सेक्रेटरी प्रवीण शिर्के यांनी मानले.