Pimpari News : पिंपरी : राज्य शासनाने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी एक अतिरिक्त आयुक्त आणि दोन उपायुक्त या पदांना मंजुरी दिली होती. त्यानुसार पिंपरीत दोन पोलीस उपायुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस उपायुक्तांची संख्या आता पाचवर पोहोचली आहे. (Pimpari News)
पोलीस उपायुक्तांची संख्या आता पाचवर
मुंबईतील यूसीटीसी फोर्स वन येथील पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे आणि नाशिकमधील महाराष्ट्र पोलीस अकादमी येथील अपर पोलीस अधीक्षक असलेले शिवाजी पवार यांची पिंपरी– चिंचवड शहरात पोलीस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश राज्याच्या गृह विभागाचे अवर सचिव स्वप्नील बोरसे यांनी काढले आहेत.
सध्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात स्वप्ना गोरे (मुख्यालय, गुन्हे), विवेक पाटील (परिमंडळ- १) आणि काकासाहेब डोळे (परिमंडळ- २) हे तीन पोलीस उपायुक्त कार्यरत आहेत. पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी आणखी दोन उपायुक्त पदांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी त्यासाठी पाठपुरावा केला.
पिंपरी-चिंचवड शहरात पोलिस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील उपायुक्तांची संख्या पाच इतकी झाली आहे. (Pimpari News)
दरम्यान, आगामी काळात झोनची संख्या वाढवण्यात येणार आहे. त्यानुसार नवीन आलेल्या उपायुक्तांची नियुक्ती करण्यात येईल; मात्र, तोपर्यंत वाहतूक आणि मुख्यालयाचा स्वतंत्र पदभार देण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. (Pimpari News)