Pimpari Crime पिंपरी, (पुणे) : नोकरीचे आमिष दाखवून एका ३९ वर्षीय महिलेची ३९ लाख ६९ हजार ६५६ रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. जुनी सांगवी परिसरात Pimpari Crime ६ ते १४ एप्रिल दरम्यान ही घटना घडली.
याप्रकरणी ३३ वर्षीय महिलेने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सांगवी पोलिसांनी सोशल मिडिया अकाउंटधारक आणि अनोळखी बँक अकाउंटधारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
आरोपींनी फिर्यादी महिलेशी सोशल मीडियावरून संपर्क केला. महिलेला नोकरी देण्याचे आमिष दाखविले. यातून महिलेला वेगवेगळे टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने महिलेकडून ३९ लाख ६९ हजार ६५६ रुपये घेतले.
दरम्यान, पैसे घेतल्यानंतर महिलेला नोकरी न देता त्यांची फसवणूक करण्यात आली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलिस तपास करीत आहेत.