सागर जगदाळे
भिगवण : डिकसळ( ता. इंदापूर ) येथील योगेश्वरी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या सभासदांना दिवाळीच्या तोंडावर १० टक्के लाभांश वाटप करण्याचा निर्णय मागील मासिक मीटिंगमध्ये संचालक मंडळाने घेतला. बुधवार (ता. १९) रोजी योगेश्वरी मंदिरात संस्थेचे पदाधिकाऱ्यांचे हस्ते प्रथम पाच ज्येष्ठ सभासदांना लाभंस वाटप करून लाभांश वाटण्यास सुरुवात करण्यात आली.
यावेळी संस्थेचे चेअरमन कैलास कुंभार,संचालक आबासाहेब हगारे, जिजाराम पोंदकुले, तानाजी सुर्यवंशी, अशोक पवार,संतोष हगारे, विजयकुमार गायकवाड सतीश काळे ,लहू भोंग, संचालक प्रतिनिधी शितलकुमार हगारे,आदी संचालक तसेच संस्थेचे माजी चेअरमन,अर्जुन सूर्यवंशी शशिकांत कुंभार, दत्तात्रेय हगारे पोलीस पाटील संदीप पवार,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भास्कर काळे, इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीचे माजी सभापती शिवदास सूर्यवंशी आदि.पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संस्थेचे संचालक विजयकुमार गायकवाड यांनी संस्थेच्या मागील ६०वर्षाच्या कार्याचा आढावा घेऊन सभासदांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
लाभांश हा सहकारी संस्थेचा आरसा असून ज्या संस्था सभासदांना लाभांश देतात त्या संस्था उत्तम रित्या चालू आहेत.हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नसल्याचे मत योगेश्वरी विविध कार्यकारी संस्थेचे संचालक विजयकुमार गायकवाड यांनी व्यक्त केले आहे.
६० वर्षाची परंपरा कायम
योगेश्वरी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची स्थापना १९६० साली झाली होती मागील ६० वर्षाच्या इतिहासात एखादा अपवाद वगळता लाभांश वाटपाची परंपरा कायम आहे. डिकसळ हे गाव नदी काठावर पुनर्वसित झाले असल्याने येथील क्षेत्र हे १०० टक्के बागायत आहे. यामुळे येथील सभासद शेतकरी उसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतात उत्पादित झालेल्या उसाचे गाळप करण्यासाठी आजूबाजूला दोन चार साखरकारखाने असल्याने ऊस जलद गतीने कारखाकडे गाळपासाठी जातो व कारखाने शेतकऱ्यांना उसाचे पेमेंट अदा करताना संस्थेची वसुली करून दिली जाते. त्यामुळे संस्थेला वसुलीसाठी फारशी अडचण येत नाही. संस्थेची वसुली झाल्यानंतर सभासदांना लांभास देण्यासाठी फारशी अडचण येत नसल्याचे संचालक मंडळांनी यावेळी सांगितले. दिवाळी सणाच्या तोंडावर लाभास मिळाल्यामुळे संस्थेच्या सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.