पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत अनधिकृत होर्डिंग्ज, फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स, किऑक्स लावण्यास बंदी आहे. शहरामध्ये अशा अनधिकृत जाहिराती आढळून आल्यास त्याची तक्रार महापालिका टोल फ्री क्रमांकावर, तसेच सारथी हेल्पलाईनवर करा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. महापालिका हद्दीतील सर्व नागरिक, वाणिज्य संस्था, जाहिरात संस्था, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, सर्व राजकीय पक्ष यांना आकाश चिन्ह व परवाना विभागाने जाहीर आवाहन केले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार महापालिका कार्यक्षेत्रामध्ये अनाधिकृत होर्डिंग्ज, फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स, किऑक्स आढळून आले असल्यास सामान्य नागरिकांना महापालिकेच्या निदर्शनास आणुन देण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यानुसार शहरात आढळणऱ्या अनधिकृत जाहिरातींबाबत सामान्य नागरिकांनी टोल फ्री क्रमांक व सारथी हेल्पलाईन क्रमांक ८८८८००६६६६, तसेच व्हॉट्सअप आणि एसएमएससाठी ९८२३११८०९०४ आणि www. pcmcindia.gov.in’ या संकेतस्थळांवर सर्व फोटो, माहितसह नागरिक तक्रार करू शकतील. नागरिकांनी याबाबत अवगत केल्यानंतर संबधित कार्यालयाकडून तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असेही आकाश चिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त प्रदीप ठेंगल यांनी म्हटले आहे.