आपण आपल्या लहान मुलांची विशेष काळजी घेत असतो. हे करताना आहार कसा असावा हे अनेकदा समजत नाही. त्यामुळे गडबड होऊ शकते. असे असल्याने सुरुवातीपासूनच आपल्या मुलांना काही सवयी लावल्यास नंतर नक्कीच फायद्याचे ठरू शकते.
बालपण म्हणजे मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास झपाट्याने होतो. अशा परिस्थितीत पालकांची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. मुलांना सकस आहार घेण्याचे मार्गदर्शन करणे ही पालकांची आणि घरातील वडीलधाऱ्यांची जबाबदारी आहे. खाण्यापिण्याची योग्य सवय बालपणातच लावली तर अशी मुले भविष्यात निरोगी, उत्साही आणि आनंदी व्यक्ती बनतात. त्यात चपाती, पराठा, भात, पोहे, ओट्स आणि बाजरी आपल्या शरीराला हळूहळू ऊर्जा देतात, ज्यामुळे शरीर दीर्घकाळ ऊर्जावान राहते.
दूध, चीज आणि दही हे प्रथिने आणि कॅल्शियमचे मुख्य स्त्रोत आहेत. ज्या मुलांचे वजन जास्त आहे त्यांना कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ द्यावे. पालकांनी आपल्या मुलाला सर्व प्रकारची फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, गहू, मका, बार्ली, तांदूळ यासारखी धान्ये, प्रथिने (कमी चरबीयुक्त प्रथिने) आणि मांस, मासे, अंडी खाण्याची सवय लावली पाहिजे. तसेच मुलांचे जेवण हेल्दी तसेच चविष्ट असावे हेही लक्षात ठेवावे, याने शरीर तंदुरुस्त होऊ शकतं.