Wednesday, November 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पतंजलीचे 20 लाखांचे तूप जप्त; राज्यभर 9 कोटींचे अन्नपदार्थ ताब्यात

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 3 November 2026, 13:28

डॉ. अशोक बालगुडे

पुणे : सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांच्या गुणवत्तेशी तडजोड करणाऱ्यांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यव्यापी कारवाईचा बडगा उगारला आहे. पतंजली आयुर्वेदच्या सुपर वितरकाकडील 20 लाख 20 हजार रुपयांचे 2,279,7 लिटर गायीचे तूप संशयास्पद लेबलिंग आणि भेसळीच्या शक्यतेवरून जप्त करण्यात आले. राज्यातील 114 आस्थापनांमधून तब्बल 9कोटी एक लाख रुपयांचे अन्नपदार्थ जप्त करण्यात आले असून, 19 अन्नव्यवसायांचे परवाने आणि नोंदणी निलंबित करण्यात आली आहे.

अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली 28 ते 31ऑक्टोबरदरम्यान ही विशेष मोहीम राबविण्यात आली. श्री छत्रपती संभाजीनगरमधील सुंदरवाडी परिसरात केंब्रिज स्कूलजवळ असलेल्या ‘मेसर्स दिव्य महावितरक’ या पतंजलीच्या सुपर वितरकाच्या गोदामाची अचानक तपासणी करण्यात आली. तेथील गायीच्या तुपाच्या गुणवत्तेबाबत आणि लेबलवरील माहितीबाबत संशय निर्माण झाल्याने अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी हा साठा जप्त केला.

जप्त केलेल्या तुपामध्ये एकूण 4.032 युनिट्सचा समावेश आहे. त्यापैकी 2,998 युनिट्समध्ये 1,349,1 लिटर तूप असून, त्याची किंमत 12 लाख 29 हजार 180 रुपये आहे. उर्वरित 1,034 युनिट्समध्ये 930,6 लिटर तूप असून, त्याची किंमत सात लाख 91 हजार 10 रुपये आहे. अशा प्रकारे एकूण 2,279.7 लिटर तुपाची किंमत 20 लाख 20 हजार 190 रुपये आहे. या साठ्याचे नमुने अधिकृत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतरच तुपाच्या गुणवत्तेबाबत आणि नियमभंगाबाबत अंतिम निष्कर्ष काढता येणार आहे. त्यामुळे जप्तीची कारवाई म्हणजे भेसळ सिद्ध झाली, असा अर्थ होत नाही.

राज्यातील सात विभागांमधील 114 आस्थापनांमधून सुमारे तीन लाख 53 हजार किलो अन्नपदार्थ जप्त करण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे ‘अव्हेन्यू सुपरमार्ट्स’कडून एक लाख 44 हजार 218 किलो खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला. सातारा येथील ‘अमीन ट्रेडर्स’कडून 20 हजार 560 किलो तांदूळ, डाळी, गूळ आणि अन्य अन्नपदार्थ ताब्यात घेण्यात आले. पुणे विभागात साताऱ्यातील स्वाती ऑइल मिल्स आणि सोलापूरमधील एस. जी. ट्रेडर्स येथूनही खाद्यतेल जप्त करण्यात आले.

अस्वच्छ वातावरणात अन्नपदार्थांचे उत्पादन किंवा साठवणूक, कीड नियंत्रणाचा अभाव, स्वच्छतेच्या नोंदी न ठेवणे, अनिवार्य कागदपत्रांची कमतरता आणि अन्नसुरक्षा मानकांचे उल्लंघन अशा कारणांमुळे 19 आस्थापनांचे परवाने अथवा नोंदणी निलंबित करण्यात आली. यामध्ये मुंबई, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागांतील नमकीन, मिठाई आणि मसाले उत्पादकांचा समावेश आहे.

या मोहिमेत 17 आस्थापनांमधून 79 लाख 40 हजार रुपयांचे प्रतिबंधित अन्नपदार्थ जप्त करण्यात आले. 13 गुन्हे दाखल करून 16 जणांना अटक करण्यात आली, तर सात आस्थापने सील आणि सहा वाहने जप्त करण्यात आली. नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर विभागांतील 34 हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाब्यांची तपासणी करून स्वच्छता व अन्नसुरक्षेतील त्रुटींप्रकरणी 29 सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या.

अन्नसुरक्षा आणि मानके कायदा, 2006 तसेच संबंधित नियमांनुसार ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, ‘टाटा 1 एमजी’च्या मरीन कोलेजन पावडरच्या लेबलिंग आणि जाहिरातीतील कथित नियमभंगाबाबत भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने टाटा १एमजी हेल्थकेअर सोल्युशन्स, एसीएफओ फार्मास्युटिकल्स, ॲमेझॉन सेलर सर्व्हिसेस आणि फ्लिपकार्ट इंडिया यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. संबंधित कंपन्यांना स्पष्टीकरणासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

अन्नपदार्थांच्या पॅकेटवरचा ब्रँड ग्राहकाला विश्वास देतो; मात्र तो विश्वास टिकविण्याची जबाबदारी उत्पादक, वितरक आणि प्रशासन या तिघांची आहे. प्रयोगशाळेचे निष्कर्ष, दोषींवरील कारवाई आणि बाजारातील नियंत्रण यांतूनच अन्नसुरक्षेवरील नागरिकांचा विश्वास दृढ होणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दरोडा, जबरी चोरी, घरफोडी अन् वाहन चोरी करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या; १२ गुन्हे उघडकीस!

Wednesday, 4 November 2026, 17:14

शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी! दीड महिन्यानंतर रायगड रोपवे सेवा आजपासून पुन्हा सुरू

Wednesday, 4 November 2026, 17:05

रुग्णसेवा करताना महिला कर्मचाऱ्याला पतीची मारहाण; दौंडजच्या आरोग्य केंद्रातील धक्कादायक प्रकार

Wednesday, 4 November 2026, 17:03

Purandar News : शेतातील खड्ड्यावरून वाद पेटला; महिला व दोन भावांना काठीने मारहाण!

Wednesday, 4 November 2026, 17:03

Daund News : व्हिडीओ कॉलवरून पत्नीचा जाब विचारताच पतीचा संताप; लाकडी दांडक्याने मारहाण

Wednesday, 4 November 2026, 16:37

उरुळी कांचनमध्ये दुचाकी दुभाजकाला धडकली; 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

Wednesday, 4 November 2026, 16:22
Next Post

विकासाच्या नावाखाली 32 हजार झाडांवर कुऱ्हाड! सयाजी शिंदे आक्रमक; नागपुरातून ‘सेव्ह सह्याद्री’ आंदोलनाचा एल्गार!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp