Wednesday, November 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विकासाच्या नावाखाली 32 हजार झाडांवर कुऱ्हाड! सयाजी शिंदे आक्रमक; नागपुरातून ‘सेव्ह सह्याद्री’ आंदोलनाचा एल्गार!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 3 November 2026, 13:46

डॉ. अशोक बालगुडे

पुणे : विकासाच्या नावाखाली डोंगर, जंगले आणि वृक्षसंपत्तीचा ऱ्हास सुरू असेल, तर तो विकास कसला? असा सवाल करत अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी राज्य सरकारच्या वृक्षतोडीच्या धोरणावर जोरदार टीका केली. कर्जत येथील प्रस्तावित प्रकल्पासाठी 32 हजार झाडे तोडण्याच्या दाव्याला विरोध करत त्यांनी नागपुरातून ‘सेव्ह सह्याद्री’ या राज्यव्यापी पर्यावरण चळवळीची सुरुवात केली. झाडे तोडण्याऐवजी पर्यायी मार्ग शोधा आणि वृक्षतोडीचा हिशेब जनतेला द्या, अशी मागणीही त्यांनी केली.

महाराष्ट्राला कोरोनासारख्या ‘झाडखाऊ व्हायरस’ची लागण झाली आहे, अशी बोचरी टीका करत शिंदे यांनी विकासाच्या नावाखाली नैसर्गिक संपत्ती विकायला काढल्याचा आरोप केला आहे . सह्याद्रीतील जंगल, नद्या, डोंगर आणि जैवविविधतेवर विविध प्रकल्पांमुळे संकट ओढवत असून, त्याचा परिणाम छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांशी जोडलेल्या ऐतिहासिक वारशावरही होऊ शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

झाडे तोडण्याऐवजी पर्याय शोधा

‘वीज माणसासाठी हवी असेल, तर माणसाला विस्थापित करा; झाडांना नाही’, अशी भूमिका मांडत त्यांनी विकास प्रकल्पांसाठी हजारो वृक्षांचा बळी देण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला. सह्याद्रीतील वृक्षतोडीमुळे राज्याचा प्राणी असलेल्या शेकरूच्या अधिवासालाही धोका निर्माण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

राज्यात आतापर्यंत किती झाडे तोडली, किती लावली आणि त्यातील किती जगली, याचा जिल्हानिहाय हिशेब सरकारने जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली. वृक्षारोपणाच्या घोषणा पुरेशा नसून लावलेल्या झाडांच्या प्रत्यक्ष अस्तित्वाची जबाबदारीही निश्चित झाली पाहिजे, असे ते म्हणाले.

सरकारने वृक्षतोड थांबविण्याचे ठोस आश्वासन देऊन त्याची अंमलबजावणी करेपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा इशाराही शिंदे यांनी दिला. सह्याद्रीचे संरक्षण हा केवळ पर्यावरणाचा प्रश्न नसून महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा, जलस्रोत आणि भविष्यातील नैसर्गिक सुरक्षितता जपण्याचा विषय असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांना या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दरोडा, जबरी चोरी, घरफोडी अन् वाहन चोरी करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या; १२ गुन्हे उघडकीस!

Wednesday, 4 November 2026, 17:14

शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी! दीड महिन्यानंतर रायगड रोपवे सेवा आजपासून पुन्हा सुरू

Wednesday, 4 November 2026, 17:05

रुग्णसेवा करताना महिला कर्मचाऱ्याला पतीची मारहाण; दौंडजच्या आरोग्य केंद्रातील धक्कादायक प्रकार

Wednesday, 4 November 2026, 17:03

Purandar News : शेतातील खड्ड्यावरून वाद पेटला; महिला व दोन भावांना काठीने मारहाण!

Wednesday, 4 November 2026, 17:03

Daund News : व्हिडीओ कॉलवरून पत्नीचा जाब विचारताच पतीचा संताप; लाकडी दांडक्याने मारहाण

Wednesday, 4 November 2026, 16:37

उरुळी कांचनमध्ये दुचाकी दुभाजकाला धडकली; 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

Wednesday, 4 November 2026, 16:22
Next Post

पुण्याचा चेहरामोहरा बदलणार! 2030 पर्यंत शहरासाठी मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; काय म्हणाले? वाचा!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp