Parbhani news : परभणी : लंडन येथील भारतीयांच्या वतीने मागील दहा वर्षांपासून ‘भारत गौरव पुरस्कार’ देण्यात येत आहे. विविध क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना ‘भारत गौरव पुरस्कार’ देण्यात येतो. यावर्षी जिंतूरच्या भाजप आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या आधी ‘भारत गौरव पुरस्कार’ आर्ट ऑफ लिविंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर, चित्रपट कलाकार मनोज कुमार, नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी, जगातील सर्वात प्रभावशाली महिला इंदिरा नूयी, जैन संत पुलक सागर, आचार्य लोकेश मुनी, गुगलचे सीईओ संजय गुप्ता, दिवंगत मेजर ध्यानचंद, जीमेलचे शिवा अय्यादुराई, स्व. निरजा भानोत, प्रेरक वक्ते गौर गोपालदास, सीमा तापडिया यांना देण्यात आला आहे.
ब्रिटिश संसदेत पार पडणार कार्यक्रम
मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे सामाजिक कार्य, विकासाप्रती बांधिलकी, कर्तव्यपूर्तीची भावना, पर्यावरणासाठी त्यांनी केलेले कार्य यामुळे देशाच्या सामाजिक आणि भौतिक विकासात त्यांनी भर घातल्याचे कळवत आयोजकांनी त्यांना ब्रिटिश संसदेत होणाऱ्या या पुरस्काराच्या वितरणासाठी सन्मानपूर्वक आमंत्रण दिले आहे.(Parbhani news) ब्रिटनच्या संसदेत हा सन्मान सोहळा पार पडणार आहे. चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर, गायत्री परिवाराचे मुख्य चिन्मय यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम ब्रिटिश संसदेत पार पडणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पत्रकार गोळीबार प्रकरणी बंगळुरुमधून शॉपशुटर श्रेयश मतेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या