Paranda News : परंडा : महाराष्ट्र शासनामार्फत गतीशील विकास सुरू असून परंडा , भुम वाशी तालूक्यात नवीन चार रुग्णालयास मान्यता देण्यात आली आहे. तसेच विविध कामाला मंजूरी देण्यात आली आहे. अशी माहिती सार्वजनिक आरोग्य कुटूंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री डॉ . तानाजी सावंत यांनी परंडा येथे बोलताना दिली. तसेच मे २०२४ पर्यंत उजनीचे पाणी सिनाकोळेगाव प्रकल्पात आणणारच असल्याचेही त्यांनी यावेळी आश्वासित केले.(In Paranda big response to shashan aapalya dari initiative;Guardian Minister Dr. Inauguration by Sawant)
स्व .गोपीनाथ मुंडे सभागृहात झाला कार्यक्रम
रविवार ( ता. ४ ) परंडा येथील स्व .गोपीनाथ मुंडे सभागृहात शासन आपल्या दारी उपक्रम घेण्यात आला . या उपक्रमाचे पालकमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते दिप प्रज्वलित करून उदघाटन करण्यात आले. (Paranda News) शासन आपल्या दारी योजने अंतर्गत तहसिल कार्यालय, पंचायत समिती, नगरपरिषद, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन, एकात्मिक बालविकास, सेवा योजना ,कृषी, उपअधिक्षक भुमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य विदयुत महावितरण कंपनी , या कार्यालयाच्या वतीने स्टॉल लावण्यात आले होते .
नैसर्गिक आपत्तीमुळे मयत पशुधन ९ मालकास मदत वाटप , नैसर्गिक आपत्तीमुळे जखमी ३ व्यक्तींना अनुदान वाटप , पंडीत दिनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेच्या १० , तर रमाई आवास योजनेच्या १० लाभार्थी , तुती लागवड २६ , दिनदयाळ अंत्योदय योजना ८ , शासन पुरस्कृत रमाई आवास योजना (शहरी) ५ , सेतु प्रमाणपत्र १४ , जननी सुरक्षा योजना ६ , कुक्कुटपालन व्यवसाय १ , लंपी मृत गाय अनुदान वाटप १ , मराठवाडा पॅकेज शेळी गट दुसरा १ लाभार्थी , संजय गांधी निराधार अनुदान ५ , श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना ५ , इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना ६ , इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना ६ , पंचायत समिती सेस १८ बालकल्याण २०२२-२३ लाभार्थी ५ , भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ३ , मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतर्गत शेततळे ४ , राज्य कृषी यांत्रिकीकरण ३ , एकात्मिक फलोत्पादन अभियान २ , नविन आधारकार्ड वाटप ५ , नविन / दुय्यम रेशनकार्ड वाटप २१ , उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ६ , ड्रोन सर्वे काम पुर्ण होऊन मुळ गावठाणातील मिळकत धारक यांच्या सनद ५ , डिमांड लेटर वाटप ५ , सिंचन विहीर ५ , गाय गोठा ५ , फळबाग लागवड ५ , शेळी पालन शेड ३ , विहीर पुर्नभरण ५ या लाभार्थ्यांना पालकमंत्री डॉ . सावंत यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले .(Paranda News)
या कार्यक्रमानंतर डॉ .सावंत यांनी परंडा भुईकोट किल्ला येथे भैरवनाथ शुगर च्या वतीने राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेची पाहणी केली . तसेच येथील महादेव मंदीर व मशिदी चे दर्शन घेतले.
यावेळी उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे , तहसिलदार रेणूकादास देवणीकर , गटविकास आधिकारी संतोष नागटिळक , मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली ,जि .प . माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत , शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी सभापती दत्ता साळुंके , आ . विकासरत्न प्रा. डॉ . तानाजीराव सावंत प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे ,परंडा प. स .माजी सभापती प्रा .गौतम लटके , जि . प . माजी सदस्य महादेव अंधारे , अॅड.सुभाष मोरे , उद्योजक चंद्रकांत सरडे , सुरेश डाकवाले , अशोक गरड आदी उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Paranda News : परंड्याजवळ एसटी बसला अपघात २० प्रवासी जखमी ; मदतकार्य सुरु..!