लहू चव्हाण
पाचगणी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त देश प्रेम व्यक्त करण्यासाठी आज ( ता. १७) सकाळी ११ वाजता पाचगणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामुहिक राष्ट्रगीत गाण्यात आले. यावेळी अबाल-वृध्दांनी राष्ट्रगीताचा सन्मान ठेवून त्याठिकाणी उभे राहून राष्ट्रगीताला प्रतिसाद दिला.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चला सारे जण राष्ट्रगीत गाऊया, एक अनोखा विक्रम करुया असे आवाहन केले होते. या आवाहानाला प्रतिसाद देत पाचगणीकरांनी एकत्र येत राष्ट्रगीत गाण्यात आले.
यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक गिरीश दापकेकर, माजी नगराध्यक्षा सौ लक्ष्मी कऱ्हाडकर,माजी नगरसेवक प्रवीण बोधे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मेहूल पुरोहित, रोटरीचे अध्यक्ष भूषण बोधे, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष सुनील बगाडे, रमेश शिंदे, जयवंत भिलारे, संदेश बुटाला,अमिन हाजी, नितीन कासुर्डे,भारत पुरोहित, विशाल रांजणे पालिका शाळा क्रमांक १ व २ मधील विद्यार्थी शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
याविषयी माहिती देताना गिरीश दापकेकर म्हणाले, नागरिकांच्या मनात देशभक्ती व देशप्रेम जागवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून अनोखा उपक्रम राबविला जात आहे.राष्ट्रगीत गायनाच्या माध्यमातून ही भावना जगासमोर आणण्यासाठी सामुहिक राष्ट्रगीत गायनाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांच्या मनात राष्ट्रगीत गायनाच्या माध्यमातून देशप्रेमाची भावना जगासमोर आणण्यासाठी सामुहिक राष्ट्रगीत गायनाचे आयोजन करण्यात आले आहे.