लहू चव्हाण
पाचगणी : पालिकेने बड्या थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्याची कारवाई सुरू केली आहे. व्यावसायिक व निवासी मालमत्तांच्या संबंधिची ही कारवाई असून थकबाकी न भरणाऱ्या मालमत्ताधारकांच्या मालमत्ता सील केल्या जात आहेत. पाचगणी पालिकेच्या पथकाने मंगळवारी तीन मालमत्ता सील केल्या आणि ३ लाख ८५ रुपयांचा कर वसूल केला.
कारवाईबद्दल पालिकेने दिलेल्या माहितीनुसार एल.एन.टी रोड परिसरातील एक व्यावसायिक व दोन निवासी मालमत्ता असून या तिन्ही मालमत्तांवर ४ लाख ८० हजार कर थकला होता. मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकीचे कार्यालयीन अधिक्षक दिलिप रनदिवे, बांधकाम लिपिक रवि कांबळे, सपना शेवाळे, तानाजी कासुर्डे, संदिप बगाडे, अभिषेक राजपुरे यांनी ही कारवाई केली.
पालिकेच्या पथकाने शहरातील विविध भागात थकीत मालमत्ता कराची वसूली व जप्तीची कारवाई करण्यात आली. दिवसभरात तीन मालमत्ता सील करण्यात आल्या. मालमत्तांच्या कराचा भरणा मालमत्ताधारकांनी करून पालिकेला सहकार्य करावे व कारवाई टाळावी, असे आवाहन मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी केले आहे.