लहू चव्हाण
पाचगणी : स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये पाचगणी गिरीस्थान पालिकेने अव्वल स्थान पटकावले असून पालिकेची राष्ट्रपती पुरस्कारासाठी निवड झालीं आहे. या पुरस्काराचे वितरण दि १ ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली तालकटोरा स्टेडियमवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक गिरीश दापकेकर यांनी दिली
शहर स्वच्छता, सौंदर्यीकरणावर दिलेला भर, मुख्याधिकारी,पालिका कर्मचार्यांनी झोकून केलेले काम,नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद यामुळे यावर्षीही स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पाचगणी नगरपरिषद अव्वल स्थानावर पोहोचली आहे. शहरातील सौंदर्यीकरणसाठी केली जाणारी कलात्मकता, टाकाऊ वस्तूंचा योग्य वापर व कचर्याचे योग्य नियोजन या बाबी स्पर्धेत महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत.
या स्पर्धेत नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक गिरीश दापकेकर, आरोग्य अभियंता, आरोग्य निरीक्षक,आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी यांनी झोकून देवून काम केल्याने तसेच पाचगणी तील नागरिकांचा सहभाग यामुळे देशात पाचगणी नगरपरिषद अग्रक्रमाने स्पर्धेत अव्वल राहिली आहे. एक आक्टोंबर रोजी पारितोषिक वितरण समारंभ राष्ट्रपती यांच्या उपस्थितीत होणार आहे.
दरम्यान, या अगोदर केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाचा नॅशनल टुरिझम अवॉर्ड २०२२ पाचगणी गिरीस्थान पालिकेला नुकताच जाहीर झाला असून २७ सप्टेंबरला नवी दिल्ली येथे पुरस्कार वितरण होणार आहे .सलग दोन पुरस्कार मिळाल्याबद्दल पालिकेचे कौतुक होत आहे.
याबाबत बोलताना मुख्याधिकारी गिरीश दापकेकर म्हणाले, पाचगणी पालिकेला मिळालेले दिन पुरस्कार हा सर्व पांचगणीकरांचा अभिमान आहे. नागरिकांचा सहभाग तसेच माजी पदाधिकारी, व नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्य यामुळे शक्य झाले
आहे.