Pachgani News : पाचगणी : पर्यटन नगरी पाचगणी शहरातील विविध विकास कामांसाठी महाबळेश्वर – वाई – खंडाळा मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातून प्रस्तावित केलेल्या विकास कामांवरील आताच्या सरकारने टाकलेली स्थगिती अखेर उठली आहे. पर्यटन व सांस्कृतिक विभागामार्फत तसे आदेश प्राप्त झाले असल्याने ही विकासकामे लवकरच सुरु होतील, अशी माहिती माजी नगराध्यक्ष शेखर कासूर्डे यांनी दिली.
माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे यांनी दिली माहिती
महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार उप सचिव, महाराष्ट्र शासन. उज्ज्वला सं. दांडेकर यांनी ही स्थगिती उठवल्याचे पत्र प्राप्त झाले आहे.
प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत सन २०२१-२२. या वर्षामध्ये सातारा जिल्ह्यातील प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांसंदर्भात पुढील कार्यवाही करण्यास परवानगी देण्याबाबत आणि सन २०२२-२३ या वर्षामध्ये प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामासंदर्भात पुढील कार्यवाही करण्यास परवानगी देऊन (Pachgani News) निधी वितरित करण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
सन २०२१-२२ व सन २०२२-२३ या वर्षात वेगवेगळया शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांपैकी पांचगणी नगरपरिषद हद्दीतील टेबललॅन्ड येथे वाहनतळ, परिसर विकसित करणेसाठी ३० लाख, पांचगणी गिरीस्थान नगरपरिषद हद्दीत दांडेघर नाका येथे रस्ता रुंदीकरण करणेसाठी ३० लाख आणि दांडेघर नाका येथे टोल प्लाझा व इतर अनुषंगिक कामे करणेसाठी ६० लाख रुपये ह्या (Pachgani News) कामांसाठी आ. मकरंद पाटील यांनी महायुतीच्या काळात निधी टाकला होता परंतु सरकार बदलताच नव्या सरकारने या कामांवर टाच आणली होती.त्यामुळे हा सर्व निधी स्थगितीच्या फेऱ्यात अडकला होता. पण आज या कामांना मंजुरी मिळाली असून ही कामे लवकरच सुरू होतील, अशी माहिती शेखर कासुर्डे यांनी दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pachgani News : महाबळेश्वर अंतर्गत अंगणवाडी केंद्रामध्ये मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस पदासाठी भरती..
Pachgani News : दांडेघर – गोडवली रस्त्यावर गतिरोधक तयार करण्याची मागणी
Pachgani News : नरवीर तानाजी मालुसरे यांचे भव्य स्मारक उभे रहाणार