लहू चव्हाण
Pachgani News : पाचगणी : परिसरात मंगळवारी (ता. २६) दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पसरणी घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरू झाले आहे. घाटातील दत्त मंदिराजवळ आज दुपारी साडेतीनच्या सुमारास दरड कोसळल्याने मोठ-मोठे दगड रस्त्यावर पडले असून, रस्त्यावर माती पसरली आहे. त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
वाहनचालकांना करावी लागत आहे तारेवरची कसरत
पाचगणी-महाबळेश्वर पर्यटन स्थळाकडे येण्यासाठी या घाट मार्गाने प्रवास करावा लागतो. (Pachgani News) वाईकडे जाताना घाटातील दत्त मंदिरानजीक दुसऱ्या वळणावर दरड कोसळल्याने मोठ-मोठे दगड रस्त्यात पडले असून, वाहतूकीला अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.