Pachgani News | पांचगणी : खिंगर ग्रामपंचायतीने चौफेर प्रगती केली असून सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय हे त्याची साक्ष आहे. सर्व सुविधांनी युक्त असे हे ग्रामपंचायत कार्यालय गावाच्या वैभवात नक्कीच भर घालेल, असे मत खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.
खिंगर (ता. महाबळेश्वर ) येथील ग्रामपंचायत कार्यालयाचा लोकार्पण सोहळा आणि रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील बोलत होते. यावेळी आमदार मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे, समन्वय समितीचे माजी अध्यक्ष प्रवीण भिलारे,ऑल इंडिया स्ट्रॉबेरी ग्रोवर असोसिएशनचे अध्यक्ष नितीन भिलारे, माजी सभापती संजय गायकवाड, बाजार समितीचे संचालक राजेंद्र भिलारे, गुलाब गोळे, महादेव दुधाने, सरपंच दिनकर मोरे, उपसरपंच विठ्ठल दुधाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने, ग्रामसेवक सपना जाधव तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
जनतेचा पाठिंबा ही आमची ताकद असून खिंगर ग्रामस्थांनी राजेंद्रशेठ राजपूरे यांचेवर दाखवलेला विश्वासही या गावच्या विकासाची पोहचपावती आहे. असे पाटील म्हणाले.
राजेंद्र राजपूरे म्हणाले आमदार मकरंद पाटील यांच्या माध्यमातून आपण गावोगावी विकासाची गंगा पोहोचवली आहे. खिंगर गावचे उर्वरित प्रश्न आबांच्या सहकार्यातून सोडविणार असल्याचे सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते फित कापून इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. तर आलेल्या मान्यवरांचा यावेळी विठ्ठल रखुमाईची मूर्ती व शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. अशोक दुधाने यांनी प्रास्ताविक केले. प्रमोद पवार यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश दुधाने यांनी आभार मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Satara News | दिवंगत सेवानिवृत्त अभियंता पोपट झेंडे यांना रिपब्लिकन पक्षाच्या वतीने श्रद्धांजली
Pachgani News : देवस्थान जमिनीवरील अनाधिकृत बांधकामांवरील वीज तोडणी तत्काळ थांबविण्याची भाजपची मागणी