लहू चव्हाण
Pachgani News : पाचगणी : स्वावलंबी भारत अभियान आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या उद्योजकता विकास यात्रा रथाचे पाचगणी शहर परिसरात नागरिकांसह श्रीमती मीनलबेन महेता कॉलेज व श्रीमती कांताबेन जे.पी.महेता ज्युनिअर कॉलेजमध्ये तरूणाईने जल्लोशात स्वागत केले. माहितीपत्रक ,लघुपट व व्याख्यानाद्वारे उद्योजकतेविषयी रथ यात्रेने केलेली जनजागृती लक्षवेधी ठरली.
माहितीपत्रक, लघुपट व व्याख्यानातून उद्योजकतेविषयी जनजागृती
युवा उद्योजक विजय जी पवार व तरुण व्यवसायिक प्रमुख गणेश पार्टे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या मोठ्या जल्लोषात विकास रथाचे स्वागत करण्यात आले. (Pachgani News) यावेळी माहितीपत्रकाच्या माध्यमातून नागरिक,तरूण व उद्योजक यांच्यात जनजागृती करण्यात आली. त्यास सर्वांचा उर्त्फूत प्रतिसाद मिळाला.
स्वावलंबी भारत अभियान आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रदेश यांचा संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या उद्योजकता विकास यात्रा रथ पाचगणी शहर,श्रीमती मीनलबेन महेता कॉलेज व श्रीमती कांताबेन जे.पी.महेता ज्युनिअर कॉलेजजमध्ये शनिवारी दाखल झाला. (Pachgani News) विकास यात्रा रथ पांचगणी बस स्थानक परिसर व छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल झाल्यानंतर उद्योजकता विषयीच्या माहितीपत्रकाचे वाटप करण्यात आले. केले.
दरम्यान, यावेळी युवा उद्योजक प्रशांत डोंगरे, प्रा.केदार देशमुख, युवा उद्योजक विजय जी पवार यांनी व्याख्यानातून विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे महत्व, उद्योग क्षेत्रातील करिअरच्या संधी, उद्योगासाठीच्या शासनाच्या विविध योजना आदीविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सतीश देसाई होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाबळेश्वर तालुका संयोजक रोहित राजपुरे यांनी केले. (Pachgani News) सूत्रसंचालन सातारा जिल्हा संयोजक श्रीनाथ साळुंखे यांनी तर आभार सांगली विभाग संयोजकपराग कुलकर्णी यांनी मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pachgani News : सुभेदार तानाजी मालुसरे स्मारकाचे उद्या गोडवली येथे लोकार्पण
Pachgani News : पाचगणी येथील विद्यानिकेतनच्या विद्यार्थिनींनी पोलिसांना बांधल्या राख्या