Pachgani News : पाचगणी, (सातारा) : पर्यटन नगरी पाचगणी येथील टेबल लॅंन्ड पठारावर दारू व गांजा सेवन करुण गायडिंगच्या नावाखाली पर्यटकांकडून अवाच्या सवा पैसे उकळणाऱ्या इसमांविरुध्द कठोर कारवाई करण्यासंदर्भात पोलिस व पालिका प्रशासनान ॲक्शन मोडवर आले आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पाचगणी पोलिसांनी पायी गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. Pachgani News
टेबल लॅंन्ड पठारावर पावसाळ्यात येणाऱ्या विविध फुलांचे संवर्धन व्हावे यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १३ जुन ते १३ सप्टेंबर कालावधीत प्रत्येक वर्षी घोडे व घोडागाडी बंद असतात याचाच फायदा घेत गाईड करणारे काही इसम टेबल लॅन्डवर दारू व गांजा सेवन करुण पर्यटका कडून अवाच्या सवा पैसे उखळत असल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यासह नगरपालिकेला नागरिकांनी दिल्या होत्या. Pachgani News
तसेच पर्यटकांना उर्मट पध्दतीचे वागणूक देत असल्या बद्दल टेबल लॅंन्ड स्टाॅल मालक संघटनेने नगरपपरिषदेचे मुख्याधिकारी व पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले होते. या अनुषंगाने पालिकेची पथका मार्फत देखरेख व पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू करण्यात आले आहे. Pachgani News
यावेळी पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल जाधव म्हणाले, “टेबल लॅंन्ड पठारावर घडत असणाऱ्या गैर प्रकाराबाबत पालिका प्रशासनाची नजर असून पर्यटकांकडून अवाच्या सव्वा पैसे उकळनाऱ्यांवर पोलीस व पालिका प्रशासनाकडून सुरू आहे.”
पर्यटकांना तक्रार देण्याचे आवाहन..
पाचगणी टेबल लॅंन्ड पठाराच्या नावलौकिकाला धक्का लावणारांची गय केली जाणार नाही. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. फसवणूक झाली किंवा व्यावसायिकांनी जादा पैसे घेतले असल्यास पर्यटकांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी असे आवाहन पाचगणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांनी केले. Pachgani News