लहू चव्हाण
पाचगणी : वन्य प्राणी वाचवणे ही काळाची गरज असून पाचगणी व परिसरातील प्राणीमित्र हे काम चोख बजावत आहेत. त्यामुळे या प्राण्यांना जीवदान देताना आपला जीव धोक्यात घालणारे हे प्राणीमित्र तंदुरूस्त व सुदृढ ठेवणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. असे मत प्रतिपादन डॉ पूनम थोपटे यांनी केले.
पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथील टाऊन हॉल येथे ॲनिमल रेस्क्यू टीम व एस.ओ. एस. ग्रुप पाचगणी यांचे संयुक्त विद्यमाने धनुर्वात लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्या प्रसंगी डॉ. डॉ. पूनम पाडळे – थोपटे बोलत होत्या.
यावेळी ॲनिमल रेस्क्यू टीमच्या अमृता पोरे, राजीव बोरा, निहाल बागवान, निखिल थोपटे, सायली कदम, सीमा समेळ, सचिन भिलारे , स्वप्निल परदेशी वारा ग्रुप वाई , नेचर केअर ट्रेकर्स करहर, ऍनिमल रेस्क्यू टीम, एस.ओ. एस टीम चे कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. पाडळे – थोरात म्हणाल्या, पाचगणी परिसर हा दुर्गम जंगलाने वेढलेला आहे. त्यामुळे सर्प, वन्य हिंस्र प्राणी, यांचा वावर अधिक आहे. अनेकदा रीसक्यू मोहीम राबविताना प्रसंगी व्यक्ती स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करतात. या करीता दक्षता म्हणून प्राथमिक धनुर्वात (लस ) टी टी इंजेक्शन्स गरजेचं आहे.
दरम्यान, या शिबिरात पांचगणी, जावळी, वाई, या परिसरातील सर्व प्राणी मित्रांना मोफत धनुर्वात (लस) चे इंजेक्शन्स देण्यात आले. याकरिता या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.