रायगड : रायगडच्या मुरूडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका ७ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. भावासोबत समुद्रकिनारी फिरायला गेले असता ही घटना घडली. मुरूडच्या कोर्लई गावातील धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे रायगडमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रेवदंडा पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुरूड तालुक्यातील कोर्लई इथं अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ७ वर्षांची मुलगी आपल्या भावासोबत समुद्र किनारी फिरायला गेली असताना आरोपी या मुलीला समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या बोटीवर घेऊन गेला आणि त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
पीडित मुलीने घडलेला सर्व प्रकार आपल्या भावाला सांगितला तेव्हा ही घटना उघड झाली. या घटनेप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात आरोपी पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल केला गेला आहे. सध्या पीडित मुलीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.