दीपक खिलारे
इंदापूर : जेष्ठ नागरिक संघ इंदापूर तालुका यांच्या वतीने संघाच्या सदस्यांसाठी नुकतेच सहलीचे आयोजन करण्यात आयोजन करण्यात आले होते. राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी श्रीफळ फोडून सहलीसाठी बस रवाना केली. संघातील ४० सदस्य सहलीसाठी गेले होते.
यावेळी सदस्यांना पर्यटन स्थळामध्ये पाचगणी ( टेबल लॅण्ड), महाबळेश्वर (इको पॉईंट, लेक सरोवर व अर्थर स्वीट) गड-किल्ल्यामध्ये प्रतापगड, रायगड किल्ला, महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे तसेच धार्मिक स्थळामध्ये गणपतीपुळे येथे गणेश दर्शन पावस येथे स्वरुपानंद स्वामी दर्शन, नाणिज येथे नरेंद्र महाराजांचा मठ, कोल्हापूर येथे ज्योतिबा व महालक्ष्मी दर्शन आदी ठिकाणचे दर्शन घडविण्यात आले. यावेळी जेष्ठ नागरिकांनी सहलीचा मनमुराद आनंद लुटला.
जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नंदकुमार गुजर, उपाध्यक्ष पांडुरंग जगताप, खबाले महाराज, संघाचे सचिव हनुमंत शिंदे, संघाचे खजिनदार विष्णुपंत चौधरी यांनी सहलीचे नियोजन केले होते. तर बाबासाहेब घाडगे, भानुदास पवार व काशिनाथ जगताप यांनी सहल यशस्वीपणे पार पडण्यासाठी सहकार्य केले.