उरुळी कांचन : येथील कस्तुरी प्रतिष्ठानच्या वतीने दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून सामुदायिक विवाह सोहळ्याचे यंदाचे १७ वे वर्ष आहे.
उरुळी कांचन येथील कस्तुरी मंगल कार्यालयात ७ डिसेंबरला हा सोहळा रंगणार आहे. या मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा व खर्च वाचवावा असे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद मेमाणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या विवाह सोहळ्यातील वधुवरांना लग्नाचा पोशाख, जीवनावश्यक संसारोपयोगी भांडी, बूट, चप्पल व सर्वांची भोजनाची व्यवस्था प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येणार आहे.
तसेच या विवाह सोहळ्यात सर्व धर्मीयांचा सहभाग आहे. दरम्यान, भव्य मिरवणुकीचेही आयोजन करण्यात आले आहे. विवाह नोंदणी करण्यासाठी उमेदवाराचा दाखला घेऊन उरुळी कांचन येथील कार्यालयात जनसंपर्क करावा असे आवाहन देखील मेमाणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.