पुणे : यंत्रशिल्प टेक्नॉलॉजीज, धायरी यांच्या वतीने कंपनी स्थापना दिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन कंपनीच्या आवारात करण्यात आले होते. या शिबिरात ४४ रक्त बाटल्यांचे संकलन करण्यात आले. या उपक्रमाचे उदघाटन कंपनीचे संचालक अविनाश गावंडे व संगीता गावंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी खडकवासलाचे अध्यक्ष काकासाहेब चव्हाण, भाजपचे माउली लायगुडे, उद्योजक गोपाळ पाटील, विशाल पोकळे, उद्योजक अतुल काकतकर, मिलींद राजवाडे, मारुती बाजारे, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमात रक्त बाटल्यांचे संकलन रेड प्लस ब्लड सेंटर, भोसरी यांच्या वतीने करण्यात आले. त्याबरोबरीने देहदान, या विषयावर देखील मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमात कंपनीतील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी आपला सहभाग नोंदविला.