अजित जगताप
सातारा : महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिन- दलित- शोषित- कष्टकरी लोकांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना स्वाभिमानाने मार्ग दाखवला. डॉ. आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाणदिनी त्यांना अभिवादन करून गरजू लोकांच्या समस्या जाणून घ्याव्यात व त्यावर उपाययोजना करावी अशी मागणी आंबेडकरवादी जेष्ठ कार्यकर्ते प्रेमानंद जगताप, श्याम रोकडे, वंचित बहुजन आघाडीचे तुषार बैले यांनी केली आहे
सातारा जिल्ह्यामध्ये सुमारे १८०० वाड्या- वस्त्यांमध्ये दलित, कष्टकरी, भटक्या लोकांची वसाहत आहे. मूलभूत सोईंशिवाय अनेक समाज बांधव राहत आहेत. अशा बांधवांना दिलासा देण्याचे काम फुले-शाहू-आंबेडकरी कार्यकर्ते करत आहेत.
त्यामुळे यंदाच्या ६६ व्या महापरिनिर्वाणदिनी सर्व वाड्या वस्ती व दलित वस्तीला भेट देऊन लेखी स्वरूपात घ्यावेत. ही निवेदने योग्य प्रशासकीय यंत्रणेपर्यंत पोचविण्याचे काम सर्व आंबेडकरी कार्यकर्ते करतील. सर्व आंबेडकरी कार्यकर्त्यांकडून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्राथमिक स्वरूपात ३१ डिसेंबर पर्यंत ही निविदाने स्वीकारण्यासाठी स्थानिक कार्यकर्ते उपस्थित असतील. कार्यकर्ते उपस्थित नसतील तर कार्यकर्त्यांच्या मोबाईलवर संबंधित कागदपत्रे व संपर्क नंबर पाठवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.