पुणे : राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. इतर भागात मात्र उकाडा जाणवणार आहे. मुख्य शहरांमधील हवामानाची स्थिती जाणून घेऊयात.
गोंदिया, भंडारा, वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर या विदर्भातील जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर गडचिरोली, वाशिम, अमरावती, नागपूर आणि नांदेड जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये 21 मार्चला सकाळी धुकं जाणवण्याची शक्यता आहे. त्यानंतर आकाश ढगाळ राहील. मुंबईतील किमान तापमान 24 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस इतकं राहील.
पुणे शहरामध्ये उष्णता वाढल्याचं जाणवणार आहे. पुण्यातील किमान तापमान 19 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस इतकं राहणार आहे. पुण्यामध्ये संध्याकाळनंतर आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
कोल्हापूरमध्ये किमान तापमान 21 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस राहील. छत्रपती संभाजीनगरमध्ये किमान तापमान 19 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस इतकं राहील.