Monday, August 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मतदार यादीत नाव नोंदणीची संधी! 17 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याचे आवाहन, निवडणूक आयोगाच्या महत्त्वाच्या सूचना

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 8 August 2026, 22:56

पुणे : महाराष्ट्रात मतदार यादीची विशेष सखोल पुनरिक्षण प्रक्रिया सुरू आहे. भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार सध्याच्या मतदार यादीतील नागरिकांनी आपले नाव तपासून आवश्यक असल्यास बदल किंवा दुरुस्ती करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मतदारांनी 17 ऑगस्ट 2026 पर्यंत गणना अर्ज भरून संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ यांच्याकडे जमा करणे आवश्यक आहे. या अर्जावर मतदाराची स्वाक्षरी असणे गरजेचे आहे. अर्ज भरून दिलेल्या मतदारांची नावे 24 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट केली जाणार आहेत.

एका व्यक्तीचे नाव मतदार यादीत एकापेक्षा अधिक ठिकाणी नोंदवले जाणार नाही. त्यामुळे एखाद्या मतदाराचे नाव सध्याच्या यादीत दोन ठिकाणी असल्यास, त्याने आपल्या सध्याच्या वास्तव्यास असलेल्या ठिकाणच्या मतदार यादीत नाव ठेवण्यासाठी गणना अर्ज भरावा. दुसऱ्या ठिकाणी अर्ज केल्यानंतर ‘Already Enrolled’ अशी नोंद केली जाईल आणि त्या ठिकाणी नाव समाविष्ट केले जाणार नाही.

ज्या पात्र नागरिकांचे नाव प्रारूप मतदार यादीत आलेले नसेल किंवा ज्यांना मतदार म्हणून नोंदणी करायची आहे, त्यांच्यासाठी 24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर 2026 या कालावधीत दावा व हरकत नोंदवण्याची संधी देण्यात आली आहे. यासाठी नमुना क्रमांक 6 भरावा लागेल. मतदार यादीतील नावात दुरुस्ती करण्यासाठी नमुना 8, तर चुकीची नोंद वगळण्यासाठी नमुना 7 वापरता येईल.

 

मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी किंवा दुरुस्ती करताना चुकीची माहिती किंवा खोटी घोषणा केल्यास संबंधित व्यक्तीवर कायद्यानुसार कारवाई होऊ शकते. अशा व्यक्तीला एक वर्षापर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होण्याची तरतूद आहे.

विशेष सखोल पुनरिक्षणानंतर अंतिम मतदार यादी 27 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतरही मतदार यादीत आवश्यक सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू राहणार असून नागरिकांना सतत अद्ययावत नोंदणीची सुविधा उपलब्ध राहणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातील दूध भेसळ रॅकेटचं राजकीय कनेक्शन? मुख्य आरोपी माजी मंत्र्यांचा निकटवर्तीय; राजकीय वर्तुळात खळबळ

Monday, 10 August 2026, 22:52

विश्रामबाग पोलिसांची धडाकेबाज कारवाई; घरफोडीच्या ९ गुन्ह्यांचा छडा! आंतरराज्यीय टोळीतील चार जणांना अटक; तब्बल ३७ लाखांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त

Monday, 10 August 2026, 22:48

पिंपरी-चिंचवडमध्ये ४ वर्षांच्या चिमुकलीवर ७ कुत्र्यांचा हल्ला; पहा व्हायरल VIDEO

Monday, 10 August 2026, 22:03

पुण्यात भ्रष्टाचाराचा पर्दाफाश! परवाना मंजूर करण्यासाठी उत्पादन शुल्क निरीक्षकाने मागितली २२ लाखांची लाच; भ्रष्ट अधिकारी ACBच्या जाळ्यात

Monday, 10 August 2026, 21:13

पुणेकरांनो सावधान! उद्या शहरात तिरंगा रॅलीमुळे अनेक महत्त्वाचे रस्ते बंद; घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा

Monday, 10 August 2026, 20:59

‘ह्यांची पोरगी सासरी नीट नांदत नाही’ रक्तबंबाळ अवस्थेत पोलीस स्टेशनमध्ये आरडाओरड; ‘मी खून केला’ म्हणाला अन्….

Monday, 10 August 2026, 20:03
Next Post

आजचा दिवस ठरणार गेमचेंजर! 'या' राशींना पैसा, यश अन् प्रेमात मोठी खुशखबर; तुमची रास कोणती?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.