पुणे : आज विविध पक्ष आणि संघटनांच्या वतीने महापुरुषांच्या बाबतीत होणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांचा निषेधार्त बंदचे आवाहान करण्यात आले होते. त्याला स्थानिक पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. या बंदच्या पार्श्वभूमीवर पीएमपीएमएलने देखील त्याच्या ताफयातील सुमारे २०० गाड्या कमी रस्त्यावर उतरवल्या. त्यामुळे मंगळवारी रस्त्यावर केवळ १४४० बसेसच उतरवल्या.
बंदच्या पार्श्वभूमीवर आज अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. तसेच बंदमुळे प्रवासी कमी होणार असल्याचे लक्षात येताच पीएमपी प्रशासनाने सावध भूमिका घेतली. पीएमपीने तातडीने २०० बस कमी सोडण्याचा निर्णय घेतला.
पीएमपी प्रशासनाच्या सुमारे १६५० बसेस पुण्यात धावतात. काल रिक्षा चालकांच्या संपामुळे पीएमपी प्रशासनाने सुमारे १०० बसेस अधिक सोडल्या होत्या. त्याचा फायदा पीएमपी प्रशासनाला झाला. त्यामुळे काल पीएमपीच्या सुमारे १७५० बसेस त्यांच्या निर्धारित मार्गिकांवर धावत होत्या. आज मात्र त्यात बंदमुळे घट करण्यात आली. काल धावत असलेल्या १७५० बसेस पैकी २०० बस आज कमी धावल्या आहेत. ही संख्या एकूण बसच्या संख्येच्या सुमारे १० टक्के आहे.