नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यात प्रसिद्ध टेक कंपनी OnePlus ने भारतासह जागतिक बाजारपेठेत आपली फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीज OnePlus 13 आणि OnePlus Buds Pro 3 लाँच केले आहेत. याशिवाय, कंपनीने OnePlus Airwook 50W मॅग्नेटिक चार्जर देखील आणला आहे.
OnePlus 13 हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे, ज्याच्या डिस्प्लेमध्ये मॅट A++ रेटेड स्क्रीन आहे. OnePlus नुसार, फोनचा डिस्प्ले इंटेलिजेंट आय केअर 4.0 प्रमाणित असून, अंधारात वापरल्यास डोळ्यांना हानी पोहोचवत नाही. OnePlus 13 हे IP69 रेट केलेले आहे आणि त्याचा डिस्प्ले Aqua Touch 2.0 प्रमाणित आहे, याचा अर्थ तो हातमोजे घालूनही वापरता येतो. एवढेच नाही तर डिस्प्ले पाणी आणि इंजिन ऑईलमध्ये भिजल्यावरही काम करतो.
OnePlus ने OnePlus 13 आणि OnePlus 13R या दोन व्हेरियंटमध्ये नवीन सीरीज लाँच केली आहे. OnePlus 13 ची किंमत 69,999 रुपयांपासून सुरू होते आणि OnePlus 13R ची किंमत 39,999 रुपयांपासून सुरू होते. त्याच वेळी, OnePlus Buds Pro 3 ची किंमत 11,999 रुपये ठेवण्यात आली तर Airwook 50W मॅग्नेटिक चार्जर तुम्हाला 5,999 रुपयांमध्ये उपलब्ध असणार आहे.