नवी दिल्ली : सध्या पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना आहेत त्या फायद्याच्या ठरत आहे. तुम्हाला रिस्क न घेता चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर पोस्ट ऑफिसच्या योजना तुमच्यासाठी अधिक चांगल्या असू शकतात, ज्यामुळे कमी वेळेत चांगले उत्पन्न मिळू शकते. ‘पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग स्कीम’ ही योजना फायद्याची ठरत आहे.
या योजनेतून ऑफिस रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच पोस्ट ऑफिस आरडी देखील समाविष्ट आहे. या योजनेत तुम्ही दरमहा फक्त 5000 रुपये गुंतवून 8 लाख रुपयांची मोठी कमाई करू शकता. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे लोकांना सहज कर्ज मिळू शकते. 2023 मध्ये सरकारने पोस्ट ऑफिसच्या आवर्ती ठेव योजनेवरील व्याजदरात वाढ करून गुंतवणूकदारांना भेट दिली होती. हे नवीन दर ऑक्टोबर-डिसेंबर 2023 तिमाहीत लागू आहेत. उपलब्ध व्याज दर 6.7 टक्के आहे, जो तिमाही आधारावर सुधारित केला जातो. मात्र, योजनेंतर्गत वार्षिक आधारावर लाभ दिला जातो.
पोस्ट ऑफिस आरडीमध्ये गुंतवणूक आणि व्याज मोजणे खूप सोपे झाले आहे आणि जर आपण या योजनेअंतर्गत दरमहा केवळ 5000 रुपये वाचवून 8 लाख रुपयांचा पैसा उभा करू शकता. पोस्ट ऑफिस आरडीचे व्याज जर तुम्ही डिपॉझिट स्कीममध्ये दरमहा रु 5,000 गुंतवले तर तुम्ही एकूण 3 लाख रुपये त्याच्या मॅच्युरिटी कालावधीत जमा कराल आणि त्यावर 6.7 टक्के व्याज मिळेल. हा दर व्याजदरात 56,830 अॅड करेल. म्हणजे पाच वर्षांत तुमची एकूण रक्कम 3,56,830 रुपये होईल.