अजित जगताप
वडूज : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक -सामाजिक- शैक्षणिक व राजकीय क्षेत्रामध्ये पुरोगामी विचाराची साखर पेरणी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व ज्येष्ठ मार्गदर्शक श्री शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वडूज (ता. खटाव) येथील चार वर्षांची चिमुकली कन्या कुमारी वेरूनिका गणेश गोडसे हिने केक कापून ज्येष्ठ नेते श्री. पवार साहेब यांना मनापासून शुभेच्छा दिल्या. १२ डिसेंबर म्हणजे बहुजन समाजासाठी परिवर्तन विचार दिन म्हणूनच साजरा होत आहे.
दीन, दलित, कष्टकरी, महिला व शोषित समाजाला सत्तेत असताना प्रत्येक क्षेत्रात प्रतिनिधित्व देऊन खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी स्वीकारणारे ज्येष्ठ नेते श्री पवार साहेब यांनी क्रांती घडवून आणली आहे. त्यांचा आदर्श घेऊन दोन पिढ्या सामाजिक बांधिलकी जपनू कार्यरत झालेल्या आहेत. आता त्यामध्ये तिसरी पिढी ही पुढे आलेले आहे. बाल संस्कारांमधून युगपुरुष व विचारवंतांचा आदर्श मानणाऱ्या या कालावधीमध्ये वडुजनगरीच्या चिमुकलीने जेष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला. हा क्षण लक्षवेधी ठरलेला आहे.
ज्यांनी भारत देशात समता- बंधुत्व- स्वातंत्र्यासाठी व विचारातून कृतीशील कार्यक्रम राबविले आहेत. अशा महामानव युगपुरुष तसेच आदर्श व्यक्तिमत्त्वाचा आदर राखणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे. या कर्तव्याची जाणीव बालमनावर रुजवण्यासाठी वडूज नगरीचे युवा नेते गणेश गोडसे व त्यांची सुविधा पत्नी नगरसेविका सौ. स्वप्नाली गोडसे यांनी स्वतः वाढदिवसाची भेट म्हणून रक्तदान केले आहे. तसेच त्यांची कन्या हिने केक कापून एक मनापासून आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा दिलेले आहेत.
यावेळी वडूज परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी खटाव तालुक्यातील वडूज नगरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वडुजचे नगरसेविकास्वप्नाली गणेश गोडसे,चिमुकली कन्या वेरूनिका( बिबो),सौ शोभा वायदंडे, सौ राधिका गोडसे, सौ रोशना गोडसे,श्रीमती शोभा बडेकर,डॉ संतोष देशमुख,डॉ महेश माने,राजू फडतरे, अक्षय थोरवे, गणेश गोडसे,गिरीष गोडसे,वडूज नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मनोज कुंभार, तानाजीराव वायदंडे,प्रतिक बडेकर, संजय गोडसे, लालासाहेब माने, श्रीकांत काळे,शशिकांत देशमुख, योगेश जाधव, संभाजी पवार,मंदार मोहिते व मान्यवर उपस्थित होते.
वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो परंतु,आपल्या कार्याने ज्यांनी सामाजिक सेवा घडवून आणली आहे.असे पुरोगामी विचारांचा प्रभाव असलेले आदरणीय जेष्ठ नेते शरदचंद्र पवार, लोकनेते गोपीनाथ मुंडे व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र आदरणीय भैय्यासाहेब आंबेडकर अशा त्रिरत्नाचा आज त्यांच्या कार्याची उजळणी घेणारा दिवस आहे. अशा शब्दात अनेक मान्यवरांनी गौरव केला आहे.तसेच विविध ठिकाणी जाऊन शालेय साहित्य तसेच खाऊ व फळ वाटप करण्यात आले.